Ticker

6/recent/ticker-posts

विराट कोहली जीवनचरित्र ( virat kohli biography)


 विराट कोहली यांच्या जीवनचरित्र ( virat kohli biography) बद्दल माहिती देणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

विराट कोहली म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका चिकू विराट कोहली यांचे जगभरात खुप चाहते आहेत. विराट कोहली यांची एक आक्रमक स्वभावाचा खेळाडू म्हणुन ओळख आहे. विराट कोहली सचिन तेंडुलकर यांच्या नंतर भारतीय संघाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर यांच्या नंतर सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रम विराट कोहली यांच्या नावावर आहे. महेंद्र सिंग धोनी यांच्या नंतर तो दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नवावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. आयपीएल मध्ये तो एकाच संघाकडून सलग पंधरा वर्षे खेळला आहे. जगभरात त्यांची ओळख भारतीय संघाचा कणा अशी आहे. त्यांनी आपल्या क्रिकेट करिअर मध्ये भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विराट कोहली यांची ओळख रन मशिन म्हणुन सुद्धा जगभर आहे. मित्रांनो विराट कोहली म्हणतो बॅट हे खेळणे नाही, ते एक शस्त्र आहे. ते मला आयुष्यात सर्वकाही देण्यास मदत करते. तर असा आपला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या जीवनचरित्र बद्दल माहिती देणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

पूर्ण नाव= विराट प्रेम कोहली

जन्म= 5 नोव्हेंबर 1988

जन्म ठिकाण= दिल्ली 

वडिलांचे नाव= प्रेम कोहली

आईचे नाव= सरोज कोहली 

पत्नीचे नाव= अनुष्का शर्मा ( अभिनेत्री हिंदी सिनेमा )

मुलीचे नाव= वमिका कोहली 

फांदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= उजव्या हाताचा गोलंदाज (मिडीयम स्पेसर)

संघात फलंदाजीचे स्थान= मिडेल ऑर्डर 

विराट कोहली जन्म आणि शिक्षण

विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर, 1988 मध्ये भारतातील दिल्ली या ठिकाणी झाला. विराट कोहली यांनी आपले शिक्षण दिल्ली मधील विशाल भारती पब्लिक स्कूल मधून घेतले. विराट कोहली हे फक्त बारावी पास झाले आहेत.

विराट कोहली सुरूवातीचे जीवन

विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर, 1988 मध्ये भारतातील दिल्ली या ठिकाणी झाला. त्यांचे वडील प्रेम कोहली हे गुन्हेगारी वकील होते. आणि आई सरोज कोहली या घरचेच काम करायच्या  विराट कोहली यांच्या आई सांगतात विराट तीन वर्षाचा असल्या पासून क्रिकेट खेळायचा. आणि वडिलांना आपल्या बरोबर क्रिकेट खेळण्यास हट्ट करायचा. नंतर विराट मित्रांबरोबर गल्ली मध्येच क्रिकेट खेळायला लागला. त्याचा खेळ बघून लोक त्यांच्या वडिलांना सांगायचे ह्याला अकदमी ला पाठवा हा खुप मोठा खेळाडू बनेल.

 म्हणुन विराट कोहली यांच्या वडिलांनी विराट नऊ वर्षाचा असताना त्याला दिल्लीच्या पश्चिम क्रिकेट अकादमी मध्ये पाठवले. तिथे त्यांचे कोच राज कुमार शर्मा यांनी विराटला प्रोफेशनल क्रिकेट शिकवण्यास सुरुवात केली. विराट हे देवाने दिलेल्या गिफ्ट सारखे आहेत असे त्यांचे वडील प्रेम कोहली म्हणतात. विराट यांनी लवकरच क्रिकेट मधील बेसिक गोष्टी शिकून घेतल्या. 

2001, मध्ये दिल्लीच्या चौदा वर्षांच्या खालील गटात त्यांची निवड झाली नाही. म्हणुन त्यांनी पुढील एक वर्ष खुप मेहनत केली. त्या मेहनतीचं फळ प्राप्त झाले. त्यांची दिल्लीच्या पंधरा वर्षाच्या खालील गटात निवड करण्यात आली. पुढे 2002, 2003 मध्ये पॉली उम्रिगर ट्रॉफी मध्ये ते खुप चांगले खेळले. त्या ट्रॉफी मध्ये ते सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते. म्हणुन त्यांना दिल्ली संघाचा कर्णधार करण्यात आले.

2004 मध्ये त्यांची दिल्लीच्या सतरा वर्षा खालील गटात निवड करण्यात आली. 2003, 2004 मध्ये विजय मारचांड ट्रॉफी मध्ये विराट कोहलीने 4 समण्यात 470 धावा फटकवल्या  नंतर 7 सामन्यात त्यांनी 770 धावा काढल्या. सर्वाधिक धावा करणारे खेळाडू बनले. त्या वर्षी विराटच्या खेळाच्या जोरावर दिल्ली ने ट्रॉफी जिंकली. 

2006 मध्ये विराट कोहलीची निवड दिल्लीच्या एकोणीस वर्षांच्या खालील गटात करण्यात आली. तिथेही त्यांनी खुप चांगला खेळ केला. सर्वांना आकर्षित केले. विराट कोहली यांनी  वयाच्या अठराव्या वर्षी 23 नोव्हेंबर, 2006 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पण केले. तामिळनाडू विरुद्ध पदार्पण सामन्यात ते फक्त दहा धावा करू शकले. 19 डिसेंबर, 2006 मध्ये विराट कोहली यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाले असताना सुद्धा ते खेळले आणि कर्नाटक विरूद्ध 90 धावांची खेळी केली. बाद झाल्या नंतर घरी येवून वडिलांचे अंत्य संस्कार केले.

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण आणि करिअर

विराट कोहली यांनी 22 डिसेंबर, 2008 मध्ये श्रीलंकेविरु्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्या समन्यात ते फक्त 20 धावा करू शकले. त्यांनी त्यातील चौथा सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावले. 24 डिसेंबर, 2009 मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय एकदवसीय शतक झळकावले. श्रीलंकेविरुद्ध 315 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना विराटने खुप चांगली खेळी केली. तिथूनच विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये इरा सुरू झाला.

 2011 विश्व चषक संघात विराट कोहलीची निवड झाली. आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू बनले. परंतू आयुष्य परीक्ष सुद्धा घेत तुम्ही ह्या कामगीरी लायक आहात की नाही. एकदिवसीय क्रिकेट मध्ये त्यांचा खेळ चांगला होत नव्हता. पण इंग्लंड विरूद्ध 107 धावांची खेळी करून पुन्हा संघात स्थान मिळवले. 

28 फेब्रुवारी, 2012 मध्ये कॉमन वेल्थ बँक सिरीज मध्ये श्रीलंकेविरुद्ध 133 धावांची धमाकेदार खेळी केली. विराट कोहली भारतीय एकिवसीय संघाचे कर्णधार सुद्धा होते. त्यांनी आपल्या एकिवसीय करिअर मध्ये 248 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी 59.64 या फलंदाजी सरासरीने 11867 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 183 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी 58 अर्धशतके आणि 43 शतके झळकावली आहेत.

T20 पदार्पण आणि करिअर

विराट कोहली यांनी आपल्या T20 क्रिकेटची सुरुवात पदार्पण 12 जून, 2010 मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळून केली. विराट कोहली यांनी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध डेटॉल सिरीज मध्ये 60 चेंडूत, 85 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्या सिरीज मध्ये तो मेन ऑफ द सिरीज बनला होता.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरूद्ध अटीतटीच्या सामन्यात 40 चेंडूत, 57 धावा करून स्वतःच्या जीवावर भारतीय संघाला एकहाती झुंज देत विजय मिळवून दिला होता. विराट कोहलीने इंग्लंड विरूद्ध 181 धावांचा पाठलाग करताना 41 चेंडू मध्ये 66 धावांनी खेळी करून भारतीय संघाला विजयाच्या दारापर्यंत घेवून आले होते. 

विराट कोहली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय T20 करिअर मध्ये 82 सामने खेळले आहेत. त्यामधे त्यांनी 50.80 या फलंदाजी सरासरीने 2794 धावा केल्या आहेत. त्यामधे 90 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यात त्यांनी 24 अर्धशतके झळकावली आहेत. त्यांच्या नाववर एकही शतक नाही.

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण आणि करिअर

विराट कोहली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाची सुरुवात 20 जून, 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना खेळून केली. विराट कोहली यांनी आपले पहिले शतक इंग्लंड विरूद्ध 2018 मध्ये मध्ये इंग्लंडच्या मातीत 149 धावांनी सामना जिंकून देणारी खेळी केली होती.

विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात 256 चेंडूना सामोरे जाऊन 123 धावांची सुंदर खेळी साकारली होती. विराट कोहली यांनी श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले द्विशतक केले होते. त्यात त्यांनी 254 धावांची खेळी केली होती. त्याच्या जोरावर भारताने 610 धावांचे मोठे आव्हान लंकेला दिले होते.

विराट कोहली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये 79 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी  53.63 या फलंदाजी सरासरीने 7240 धावा केल्या आहेत. त्यामधे 254 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यात त्यांनी 25 अर्धशतके, आणि 27 शतके झळकावली आहेत.

त्या दिवशी मी खेळणार म्हणणारा कोहली स्टार झाला तो किस्सा 

विराट कोहलीने वनडे, t20, नंतर अता कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या गोष्टी वरून आधी कोहलीला ट्रोल केले जायचे. त्याचं गोष्टीचे आता कौतुक व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्या नेतृत्वाच, कणखर स्वभावच, त्याच्या या स्वभावच कौतुक होत. कोहली मानसिक रित्या कणखर झाला तो त्याच्या वडीलांच्या मृत्यू नंतर. कोहलीला संयमी बनवणाऱ्या त्या दिवशी काय झालं बघूया.

17 डिसेंबर, 2006 हा दिवस दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावर दिल्लीची रणजी मॅच सुरू होती. समोर भारताच्या डोमेस्टिक क्रिकेट मध्ये ज्यायांट आशी ओळखं असणारा कर्नाटकचा संघ होता. पहिल्या इनिंग मध्ये कर्नाटकने कडक बॅटिंग करत 446 धावांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या दिवशी बॅटिंग ला आलेला दिल्लीचा संघ सुद्धा कडक होता. पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. सर्व्ह वरील फलंदाज फ्लॉप झाले. विराट मात्र त्या दिवशी फॉर्म मध्ये होता. 

त्याने डाव सावरला आणि 40 धावा करून नॉट आऊट राहिला. त्या दिवशी तो घरी आला त्यांचे वडील प्यारालीसिस ने त्रस्त होते. अशातच रात्री तीन वाजता त्यांना रुदय विकाराचा झटका आला. काही उपचार करण्या अगोदरच ते गेले. सकाळी त्यांच्या अंत्य संस्कार करण्याची वेळ झाली. आणि कोहली मैदानात निघाला ईशांत शर्मा नेहमी प्रमाणे त्याला घ्यायला आला. मैदानात पोहचल्या नंतर कोहली इका कोपऱ्यात बसून होता. 

रडणाऱ्या कोहलीला मिथुन मन्हास म्हणाला घरी जा नको जावू फलंदाजीला पण कोहलीची उत्तर होत मी खेळणार त्याच्या मी खेळणार मध्ये इतकी ताकद होती की कर्नाटकच्य गोलंदाजीची पिस काढली आणि तो पोहचला 90 धावांवर शतका पासून फक्त 10 धावा दूर आणि तेवढ्यात 237 चेंडू खेळलेला कोहली बाद झाला. कोहलीचे वडील म्हणायचे मेरा विराट इंडिया केले खेलेगा और बडा स्टार बनेगा. तो फक्त भारतासाठी खेळला नाही तर सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला गेला. 

आयपीएल करिअर 

आयपीएल म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी इंडियन प्रमिअम लिग. या लीगची आपण सर्वजण वर्ष भर वाट बघतो. ही लीग दर वर्षी येते. या लीगला सुरुवात झाली 2008 पासून विराट कोहलीने आपल्या आयपीएल करिअर ची सुरुवात आयपीएल च्या पहिल्या वर्षी पासून केली. पहिल्याच वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (rcb) संघाने 20 लाख रुपयांची बोली लाऊन त्याला आपल्या संघात स्थान दिले.

पहिल्याच वर्षी त्याने राहुल द्रविड कर्णधार असलेल्या rcb सांघा साठी खूप चांगले प्रदर्शन करत 13 सामन्यात 165 धावा केल्या होत्या. 2009 मध्ये, 16 सामन्यात 246 धावा करून आरसीबी संघाला उपांत्य फेरी पर्यंत घेऊन गेला होता. 2008 पासून एकाच संघात खेण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे. विराट कोहलीने आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. परंतू विराट कोहलीला एकदाही आरसीबि संघाला आयपीएल किताब मिळवून देता आला नाही.

विराट कोहली यांच्या नावावर आयपीएल मध्ये इका सिझन मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्यांनी 2016 मध्ये सर्वाधिक 973 धावा काढल्या होत्या. त्यात त्यांनी सर्वाधिक 4 शतके झळकावली होती. इका सिझन मध्ये सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रम सुद्धा विराटच्या नावावर आहे. सर्वात कमी वयात विराट आरसीबी संघाचा कर्णधार झाला होता. त्या वेळेस तो 22 वर्षाचा होता. आरसीबी ने विराटच्या नेतृतवाखाली खुप सामने जिंकले आहेत.

मिळालेले पुरस्कार

2012 मध्ये आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इअर

2013 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

2017 मध्ये देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार मिळाला

2018 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.


Post a Comment

0 Comments