Ticker

6/recent/ticker-posts

सौरभ गांगुली जीवनचरित्र ( saurabh Ganguly biography )


 सौरभ गांगुली यांच्या जीवनचरित्र ( saurabh Ganguly biography) बद्दल माहिती देणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

सौरभ गांगुली यांना ओळखत नाही असा एकही माणूस आपल्या भारतामध्ये सापडणार नाही. सौरभ गांगुली यांना आपल्या भारतात दादा या त्यांच्या टोपण नावाने ओळखले जाते. दादा म्हणजे भारतीय संघाचा फलंदाजीचा कणा होते. त्यांनी भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. सौरभ गांगुली यांनी भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा केले आहे. दादा यांची ओळख एक आक्रमक खेळाडू म्हणुन होती. सौरभ गांगुली म्हानजे भारतीय संघाला सापडलेला एक अनमोल हिराच होता. अस म्हणतात दादानेच भारतीय संघाला दादागिरी शिकवली. दादा कर्णधार झाले तेव्हा भारतीय संघ क्रमवारीत आठव्या स्थानी होता. दादाने तो दुसऱ्या स्थानावर आणला. दादा भारतीय संघाची आन बाण शान सर्वकाही होता. 2003 मध्ये दादाने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर भारतीय संघाला उपांत्य फेरी पर्यंत घेऊन गेला होता. आता दादा बीसीसीआय चे अध्यक्ष आहेत. सौरभ गांगुली यांच्या जीवनचरित्र बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

पूर्ण नाव= सौरभ चंडीदास गांगुली

जन्म= 8 जुलै, 1972

जन्म ठिकाण= कोलकाता पश्चिम बंगाल भारत

वडिलांचे नाव= चंडीदास गांगुली

आईचे नाव= निरुपा गांगुली

पत्नीचे नाव= डोना गांगुली

मुलीचे नाव= सना गांगुली

फलंदाजीची शैली= डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= डाव्या हाताचा गोलंदाज

जन्म आणि शिक्षण

सौरभ गांगुली यांचा जन्म 8 जुलै, 1972 मध्ये भारतातील पश्चिम बंगाल मधील कोलकाता मध्ये झाला. त्यांनी त्यांचे सुरूवातीचे शिक्षण सेंट जाविर स्कूल मधून घेतले आहे. 

सुरूवातीचे जीवन

सौरभ गांगुली यांचा जन्म 8 जुलै, 1972 मध्ये पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे झाला. सौरभ गांगुली यांचे वडील चंडीदास गांगुली हे शहरातील एक मोठे व्यापारी होते. त्या बरोबरच ते बंगाल क्रिकेट असोसएशन चे सदस्य सुद्धा होते. वडीलांमुळे सौरभ यांनी मैदानावर जायला सुरुवात केली. आणि फुटबॉल चे दिवाणे झाले. त्यांनी सुरूवातीचे शिक्षण सेंट जविर स्कूल मधून घेतले. तिथेच ते दहावी पर्यंत फुटबॉल खेळले. ते रोज दुखापत करून घरी यायचे. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जात नव्हते.

त्यांच्या आईला वाटायचे सौरभ यांनी चांगले शिक्षण घ्यावे म्हणुन सौरभ गांगुली यांचे फुटबॉल खेळणे बंद झाले. 10 नंतर मिळालेल्या सुट्टीत सौरभ ने  घरी सर्वांना खूप त्रास दिल्या मुळे त्यांना त्यांच्या मोठ्या भावा बरोबर  क्रिकेट मैदानावर पाठवायला सुरुवात केली. अशा प्रकारे सौरभ गांगुली यांच्या आयुष्यात क्रिकेट खेळाची सुरुवात झाली. घरच्यांपासून वाचण्यासाठी त्यांनी मैदानावर वेळ घालवण्यास सुरुवात केली. त्या वेळी ते फक्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायचे कधी फलंदाजीची संधी मिळाली तर भावाचे प्याड आणि ग्लोज घालून डाव्या हाताने फलंदाजी करायचे.

ते फक्त सुट्टी घालवण्यासाठी क्रिकेट खेळायचे पण नशिबात काही वेगळंच होतं. 1987 मध्ये कोच परमार यांच्या सांगण्यावरून सौरभ गांगुली यांना बंगाल संघात स्थान दिले. त्यात त्यांनी शतक करून संघाला सामना जिंकून दिला. मग मात्र त्यांचा क्रिकेट कडे पघण्याचा दृषटिकोन बदलला. मग त्यांना क्रिकेट खेळून आनंद मिळू लागला. जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी खुप चांगला खेळ केला. 1989 मध्ये त्यांना बंगाल संघात जागा मिळाली पण अंतिम अकरा मध्ये ते स्थान मिळवू शकले नाहीत. मग रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात त्यांना रजनी पदार्पण केले. आणि मग मागे वळून पाहिले नाही. 

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण आणि करिअर

सौरभ गांगुली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय एकिवसीय क्रिकेची सुरुवात 11 जानेवारी 1992 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना खेळून केली. पण त्या सामन्यात ते फक्त तीन धावांवर बाद झाले. त्यांनी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक केले. त्या सामन्यात त्यांनी 126 चेंडू खेळून 113 धावा फटकावल्या होत्या. त्यांनी लंकेची पळता भुई थोडी केली होती. 

त्याचं वर्षी सहारा कपात खेळताना पाकिस्तान विरूद्ध चांगले प्रदर्शन केले. त्या सीरिज मध्ये त्यांना सलग चार मेन ऑफ द मॅच किताब मिळाले होते. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले खेळाडू बनले. 1998 साली झालेल्या इंडिपेंडट डे ट्रॉफी मध्ये अंतिम सामन्यात भारत विरूद्ध पाकिस्तान. पाकिस्तान संघाने भारतीय संघा समोर 314 धावांचे मोठे आव्हान उभे केले.  त्या काळी 280 धावांचा पाठलाग करणे सुद्धा अवघड मानले जायचे.

त्या सामन्यात सलामीला आलेल्या सौरभ गांगुली यांनी 124 धावांची खेळी करून भारतीय संघाला मजबूत जगी उभे केले. आणि पाकिस्तान संघाला दाखवून दिले भारतीय संघाला कोणतेच आव्हान मोठे नाही. भारतीय संघाने हा सामना तीन विकेट्स ने जिंकला. त्यांच्या शतकी खेळी साठी त्यांना मेन ऑफ द मॅच किताब देण्यात आला. आता ते भारतीय संघाचे प्रमुख सदस्य बनले होते.

1999 साली होणाऱ्या वर्ल्ड कप साठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी करत 158 चेंडूत 17 चौकार आणि 7 षटकार मारून 183 धावांनी खेळी केली. त्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 373 धावांचे लक्ष्य दिले. आणि भारताने हा सामना 157 धावांनी जिंकला. सौरभ गांगुली पुन्हा एकदा मेन ऑफ द मॅच बनले. 

2000 साली मॅच फिक्सिंग प्रकरणात भारतीय कप्तान अझरुद्दीन यांचे नाव आले आणि त्यांना क्रिकेट खेळण्यावर प्रतिबंध लागले. आणि भारतीय  संघाचे नेतृत्व सौरभ गांगुली यांच्या कडे आले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आणि ते सुद्धा चांगल्या धावा करत होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही हे भारतीय संघाला शिकवले. 

त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट करिअर मध्ये 311 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 41.02 या फलंदाजी सरासरीने 11363 धावा केल्या आहेत. त्यामधे 183 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यांनी 72 अर्धशतके आणि 22 शतके झळकावली आहेत. 

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण आणि करिअर

सौरभ गांगुली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटची सुरुवात 20 जून, 1996 मध्ये इंग्लंड विरूद्ध आपला पहिला सामना खेळून केली. त्या सामन्यात त्यांनी 301 चेंडू खेळून 131 धावांची खेळी केली होती. त्या मैदानात आता पर्यंत पदार्पण सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम सौरभ गांगुली यांच्या नावावर आहे. त्यांच्या हया खेळाच्या जोरावर त्यांना पुन्हा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यांची संधी मिळाली. त्या सामन्यात त्यांनी 136 धावांनी चांगली खेळी केली. 

सलग दोन शतक झळकावणारे ते जगातील तिसरे फलंदाज बनले. त्यानंतर ते कसोटी क्रिकेट मध्ये मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत होते. म्हणुन त्यांना संघातून वगळण्यात येणार अशी चर्चा असताना त्यांनी वर्षाच्या शेवटच्या चार सामन्यात सलग तीन शतके मारून आपले स्थान संघात टिकून ठेवले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

सौरभ गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दवऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध दोन एक ने सिरीज जिंकून उस्त्रोलिया संघाचा घमंड तोडला होता. 2007 मध्ये कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक 1000 धावा करून एक नंबर पायदानावर राहिले. 

त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट करिअर मध्ये 113 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 42.17 या फलंदाजी सरासरीने 7212 धावा केल्या आहेत. त्यात त्यांनी 25 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली आहेत.

आयपीएल करिअर

सौरभ गांगुली हे भारतीय संघा साठी खूप महत्वाचे खेळाडू होते. 2008 आयपीएल मध्ये ते कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळले होते. त्यांनी 2008 साली कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केले होते. त्या पुर्ण सिझन मध्ये त्यांनी 13 सामने खेळून 349 धावा केल्या होत्या. सौरभ गांगुली संघात असल्या मुळे kkr संघाचे चाहते खुप झाले होते.

2009 मध्ये पुन्हा एकदा कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळले परंतू संघाचे कर्णधापद त्यांच्या कडे नव्हते. त्यांनी त्या सिझन मध्ये 13 सामन्यात 189 धावा केल्या होत्या. 

2010 मध्ये शेवटच्या वेळेस कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना 14 सामन्यात 493 धावा केल्या होत्या. ते त्याचे आयपीएल मधील सर्वात यशस्वी वर्ष होते.

2011 मध्ये नवीन संघ पुणे वॉरियर्स कडून खेळताना सौरभ गांगुली यांनी 4 सामन्यात 50 धावा केल्या होत्या. हे त्याच्या आयपीएल करिअर मधील सर्वात खराब वर्ष होते.

2012 मध्ये पुन्हा एकदा पुणे वॉरियर्स संघाकडून खेळताना 15 सामन्यात 268 धावा काढल्या होत्या. अशा प्रकारे 2012 पासून त्यांनी आयपीएल खेळायचे बंद केले.

दादाने लॉर्ड वर जर्सी फिरवली त्या मॅच चा किस्सा

फायनल सामना होता इंग्लंड विरूद्ध भारत इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या सलामी वीरांनी कडक शतके मारली. इंग्लंड संघाने भरतीत संघा समोर 325 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी मार खाल्ला असे वाटत होते भारत नेहमी प्रमाणे अंतिम फेरीत येवून हरणार. त्या काळात 326 धावांच लक्ष पुर्ण करणं अगदी अशक्यच होतं. 

येरवी आपण मॅच सोडून दिली असती पण ही दादाची टीम होती आरे ला कारे करणारी. सेहवाग आणि दादाने जिद्दीने सुरुवात केली. सेहवाग नेहमी प्रमाणे आपल्या झोनमध्ये होताच पण दादाची बॅट बरसत होती. खास करून अँड्रु फ्लिनटोफ वर दादाचा डोळा होता. कारण जुना हिशोब चुकता करायचा होता. सेहवाग आणि दादाने शंभर धावांची सलामी दिली. आणि दादाची विकेट पडली दादाच्या पाठोपाठ सेहवाग आणि देनेश मुंग्याही आऊट झाले. आता क्रिस वर होते सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सचिनने या सिरीज मध्ये दोन शतके मारली होती. 

द्रवीड सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये होता. पण तो फक्त 5 धावांवर बाद झाला. आता शेवटची आशा होती सचिन तेंडुलकर वर त्याने एक चौकार मारून आपण मॅच चा रंग बदलू शकतो हे दाखवले पण नेमका कवर ड्राईव्ह मारण्याचा नादात सचिनचा फटका हुकला आणि तो बोल्ड झाला. सचिनची विकेट पडली आणि सगळ्या भारतातले टिव्ही बंद झाले. युवरासिंग आणि मोहम्मद कैफ या तरुण आणि तडपदार जोडीने मोठे फटके मारायला सुरुवात केली. 

मॅच अजून संपली नाही म्हणत लोकांनी परत टिव्ही सुरू केला. युवी आणि कैफने मॅच ओढून आणली होती. पण युवराज 69 धावांवर बाद झाला. परत एकदा आपल्याला आल टेंशन कारण युवराज नंतर सर्व्ह गोलंदाजच होते. अजून 50 ते 60 धावा करायच्या होत्या. पण कैफने जिद्द सोडली नाही. तो गोलंदाजांना हाताशी धरून खेळत राहिला. सामना अगदी शेवटच्या ओव्हर मध्ये गेला. शेवटच्या ओव्हर मध्ये भारताने सामना मारला. 

त्याचं सेलिब्रेशन अगदी अनोख्या पद्धतीने झालं लॉर्ड च्या पांढरपेशा बाल्कनीत दादाने शर्ट काढला आणि हवेत फिरवला. त्याच्या आदल्या वर्षी फ्लिनटोफने आपल्या वानखेडे स्टेडियमवर शर्ट काढून सेलिब्रेशन केल होत. दादाने फ्लिनटोफचा हिशोब चुकता केला. तोही त्याच्याच भाषेत त्याच्याच मैदानावर.

मिळालेले पुरस्कार

1997 मध्ये भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 

2004 मध्ये देशातील चौथा सर्वोच्च नागरी पद्मश्री पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

2015 मध्ये प्रश्टिजियश मेलबोर्न क्रिकेट क्लब ने लाईफ टाईम मेंबर हा किताब मिळाला.

2013 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने बंगा विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments