Ticker

6/recent/ticker-posts

रोहित शर्मा जीवनचरित्र (rohit sharma biography)


 रोहित शर्मा यांच्या जीवनचरित्र ( ROHIT SHARMA BIOGRAPHY ) बद्दल माहिती देणार आहे ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा. 

रोहित शर्मा म्हणजेच आपल्या भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांना ओळखत नाही असा एकही माणूस आपल्या भारतामध्ये सापडणार नाही. रोहित शर्मा यांचे जगभरात खुप चाहते आहेत. रोहित शर्मा यांना रो सुपर हिट शर्मा या त्यांच्या टोपण नावाने ओळखले जाते. रोहित शर्मा म्हणजे भारताचा सर्वात यशस्वी सलामीचा फलंदाज, रोहित शर्मा यांनी भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मुंबई इंडियन्स संघाला पाच किताब मिळवून दिले आहेत. एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एकदिवीय क्रिकेट मध्ये तीन वेळा दुहेरी शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. आपल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या जीवनचरित्र बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

पूर्ण नाव= रोहित गुरुनाथ शर्मा

जन्म= 30 एप्रिल, 1987

जन्म ठिकाण= नागपूर, महाराष्ट्र

टोपण नावे= रो सुपर हिट शर्मा, हिटम्यान, सिक्सर किंग, शान, ब्रोथमैन

वडिलांचे नाव= गुरुनाथ शर्मा

आईचे नाव= पूर्णिमा शर्मा

पत्नीचे नाव= रितिका सजदेह 

मुलीचे नाव= समीरा

विशेषता= फलंदाज

फलंदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= उजव्या हाताचा गोलंदाज( ऑफब्रेक)

जन्म आणि शिक्षण

रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल, 1987 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी झाला. रोहित शर्मा यांनी आपले सुरूवातीचे शिक्षण आजी आणि आजोबा यांच्या घरी राहून घेतले. नंतर त्यांनी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मधून आपले शिक्षण घेतले.

सुरूवातीचे जीवन

रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल, 1987 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा होते ते इका परिवहन कंपनीत देखरेख करण्याचे काम करायचे. त्यांच्या आईचे नाव पौर्णिमा शर्मा आहे त्या घर काम करायच्या, रोहित शर्मा यांना एक भाऊ सुद्धा होता त्याचे नाव विशाल होते. रोहित शर्मा यांची घरची परिस्थिती खुप बेताची होती त्यामुळे रोहित शर्मा दीड वर्षाचा झाला तेंव्हा त्यांच्या वडिलांनी पैसे कमावण्यासाठी मुंबई ला राहायला जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबई मध्ये रोहित शर्मा यांच्या वडिलांनी डोंबिवली मध्ये एक खोली भाड्याने घेतली. त्यांच्या कमी कमाई मुळे दोन्ही मुलांना सांभाळणे शक्य न्हवते. म्हणुन रोहितला बोरिवली येथे त्यांच्या आजी आजोबा कडे राहण्यासाठी पाठवले. आठवड्यातून एकदा रोहित आई वडिलांना भेटण्यासाठी यायचा शाळेच्या दिवसापासूनच रोहित ने गल्ली क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला क्रिकेट आवडू लागले.

1999 मध्ये रोहित शर्मा यांनी आपल्या आजोबांकडून पैसे घेउन एका क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला. तेथील त्यांचे कोच दिनेश लाड यांनी रोहितची प्रतिभा ओळखून. त्यांनी रोहित शर्मा ला आपली शाळा बदलून स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्या शाळेत ते स्वता कोच होते. वडिलांची कमाई कमी असून सुद्धा रोहित शर्मा ने क्रिकेट सारखा महागडा खेळ आपले करीअर म्हणुन निवडला.

दिनेश लाड यांच्या मदतीने मिळालेल्या कॉलर शिप च्या मदतीने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळवला. आणि हाच निर्णय रोहित शर्मा यांच्या जीवनातील महत्वाचा भाग ठरला. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये क्रिकेट साठी लागणाऱ्या सर्व सोई सुविधा उपलब्ध होत्या. रोहित सुरुवातीला खुप सारे फलंदाज असल्यामुळे स्पिन गोलंदाज म्हणून खेळायचा.

सुरुवातीला रोहित आठ किंवा नवू नंबरला फलंदाजी करायचा नंतर दिनेश लाड यांनी त्यांची फलंदाजी करण्याची क्षमता बघून त्यांना आठ नंबर वरून एक नंबर ला पाठवले. फिल शिल्ड टूर्नामेंट मध्ये त्यांना पहिल्यांदा ओपनिंग करण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्यांनी 120 धावांची खेळी केली. 

आंतरराष्ट्रिय t20 पदार्पण आणि करिअर 

2007 मध्ये भारत आयर्लंड दैवर्यावर गेला होता. खर तर त्याचं सामन्यात त्याने पदार्पण केले होते. पण त्या सिरीज मध्ये त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 20 सप्टेंबर, 2007 मध्ये त्यांना विश्व चषक सामन्यात साऊथ आफ्रिका विरुद्ध आपला पहिला सामना खेळायला संधी मिळाली. त्या सामन्यात भारतीय संघाच्या 61 धावांवर 4 विकेट गेल्या होत्या, त्या सामन्यात रोहित शर्मा ने भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्या बरोबर 81 धावांची भागीदारी केली. त्यात रोहितने 40 चेंडूत 50 धावांची चांगली खेळी केली होती आणि भारत तो सामना जिंकला होता.

रोहित शर्मा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय t20 करिअर मध्ये 124 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी 32.75 च्या सरासरीने 3308 धावा केल्या आहेत. त्यात त्यांची सर्वोच्च धावसंख्य 118 आहे. त्यांनी 4 शतके, आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत.

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण आणि करिअर

रोहित शर्मा यांनी 23 जून, 2007 मध्ये आपला पहिला एकिवसीय सामना आयर्लंड विरूद्ध खेळला. 18 नोव्हेंबर, 2007 मध्ये जयपूर मध्ये खेळताना पाकिस्तान विरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय वनडे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रोहित शर्माची निवड ऑस्ट्रेलिया दौर्यावर करण्यात आली. त्या सिरीज मध्ये त्यांनी दोन अर्धशतकाच्या मदतीने 235 धावा केल्या. पण त्या नंतर रोहितच्या खेळात घसरन झाली. त्यामुळे त्याच्या जागी सुरेश रैना ला खेळवण्यात आले. 

पुन्हा संधी मिळाली तेव्हा रोहितने 28 मे 2010, मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध आपले पहिले शतक केले. नंतर दोन दिवसांनी रोहितने 30 मे 2010 मध्ये श्रीलंकेवरुद्ध दुसरे शतक झळकावले. पुढे 2 नोव्हेंबर, 2013 मध्ये रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरूद्ध आपले पहिले द्विशतक केले. नंतर 13 नोव्हेंबर, 2014 मध्ये श्रीलंकेविरद्ध दुसरे द्विशतक केले.

रोहित शर्मा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे करिअर मध्ये 228 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 48.60 च्या सरासरीने 9283 धावा केल्या आहेत त्यामध्ये त्यांची 264 हि सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यात त्यांनी 29 शतकांनबरोबर 44 अर्धशतके झळकावली आहेत.

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण आणि करिअर

रोहित शर्मा यांनी 6 नोव्हेंबर, 2013 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. 2010 लक्ष्मण दुखापती मुळे बाहेर झाला आणि रोहित शर्माला संधी मिळाली. पण मॅच आगोदर फूट ब्वाल खेळताना रोहित पण जकमी झाला. म्हणुन रुध्हीमान सहा ला संधी मिळाली. 

रोहित शर्माने आपल्या कसोटी करिअर मध्ये 44 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी 46.60 च्या सरासरीने 3076 धावा केल्या आहेत. 212 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी 8 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल

रोहित शर्मा यांनी 2015 मध्ये रितिका सजदेह यांच्याशी साखरपुडा केला. आणि 13 डिसेंबर, 2015 मध्ये सर्वांच्या साक्षीने त्यांनी विवाह केला.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना 30 डिसेंबर, 2018 मध्ये एक मुलगी झाली. त्या मुलीचे नाव त्यांनी समीरा असे ठेवले.

13 डिसेंबर, 2017 मध्ये आपल्या लग्नाच्या वाढदवसानिमित्त श्रीलंकेवरुद्ध आपले तिसरे द्विशतक केले आणि आपली पत्नी रितिका हिला लग्न वाढदिवसाची सुंदर भेट दिली.

आयपीएल करिअर

रोहित शर्माने आपल्या आयपीएल करिअर ची सुरुवात 2008 मध्ये डेक्कन चार्जर संघाकडून खेळून केली होती. त्यासाठी त्याला 4.50 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यात तो खुप चांगला खेळला. नंतर 2011 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यात तो उत्तम खेळला म्हणुन 2013 पासून मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला कायमचा कर्णधार बनवले. रोहित शर्मा आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 

त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल चे 5 किताब जिंकले अनुक्रमे 2013, 2015, 2017 2019, आणि 2020 या वर्षी त्यांनी किताब मिळविल. रोहित शर्मा आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करणारा 3 खेळाडू आहे. रोहित शर्माने आयपीएल मध्ये 5230 धावा केल्या आहेत. त्यामधे त्यांनी 213 षटकार आणि 458 चौकार मारले आहेत.

वर्ष= 2008, संघ- डेक्कन चार्जर, सामने- 13, धावा- 404, सर्वाधिक- 76 

वर्ष= 2009, संघ- डेक्कन चार्जर, सामने- 16, धावा- 362, सर्वाधिक- 52

वर्ष= 2010, संघ- डेक्कन चार्जर, सामने- 16, धावा- 404, सर्वाधिक- 73

वर्ष= 2011, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 16, धावा- 372, सर्वाधिक- 87

वर्ष= 2012, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 17, धावा- 433, सर्वाधिक- 109

वर्ष= 2013, संघ-मुंबई इंडियन्स, सामने- 19, धावा- 538, सर्वाधिक- 79

वर्ष= 2014, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 15, धावा- 390, सर्वाधिक- 59

वर्ष= 2015, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 16, धावा- 482, सर्वाधिक- 98

वर्ष= 2016, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 14, धावा- 489, सर्वाधिक- 85

वर्ष= 2017, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 17, धावा- 333, सर्वाधिक- 67

वर्ष= 2018, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 14, धावा- 404, सर्वाधिक- 76, 

वर्ष= 2019, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 15, धावा- 405, सर्वाधिक- 67

वर्ष= 2020, संघ- मुंबई इंडियन्स, सामने- 12, धावा- 332, सर्वाधिक- 80

मिळालेले पुरस्कार

रोहित शर्माला 2015 मध्ये भारत सरकारद्वारा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. खेळात उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्याला सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

2015 मध्ये सर्वोत्कृष्ट t20 फलंदाज हा पुरस्कार मिळाला.

2019 विश्व चषक कामगिरबद्दल त्यांना गोल्डन बॅट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

2020 मध्ये रोहित शर्माला सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments