Ticker

6/recent/ticker-posts

युवराज सिंह जीवनचरित्र (Yuvraj Singh Biography in Marathi)

युवराज सिंह जीवनचरित्र (Yuvraj Singh Biography in Marathi)

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला युवराज सिंह यांच्या जीवनचरित्र (Yuvraj Singh Biography in Marathi) बद्दल माहित सांगणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

युवराज सिंह यांचा जन्म (१२ डिसेंबर १९८१ ) साली पंजाबधील चंदिगढ मध्ये झाला.

फलंदाजीची शैली = डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली = डाव्या हाताचा गोलंदाज

मिळालेली पुरस्कार = 2012- अर्जुन , 2014- पद्मश्री

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण = भारत वि केन्या, तारीख 3 ऑक्टोंबर 2000 साली.

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण = भारत वी न्युझीलंड, 

तारीख 16 ते 20 ऑक्टोबर 2003.

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण = भारत वी स्कॉटलँड, तारिख – 13 सप्टेंबर, 2007

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द

फलंदाजी = सामने 58,धावा-1177

गोलंदाजी = सामने 58, विकेट 28 सर्वोत्तम कामगिरी 3/17

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द

फलंदाजी = सामने- 304, धावा-8701, शतके-14

गोलंदाजी = सामने-304, विकेट्स-111, सर्वोत्तम कामगिरी- 5/31

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द

फलंदाजी = सामने- 40, धावा- 1900 शतके- 3

गोलंदाजी = सामने- 40, विकेट्स- 9, सर्वोत्तम कामगिरी- 2/9

युवराज सिंह आयपीएल करिअर

वर्ष = 2008- किंग जी एलेवन पंजाब, मॅच- 15, रन- 299, विकेट- 3

वर्ष = 2009- किंग जी एलेवन पंजाब, मॅच- 14, रन- 340, विकेट- 6

वर्ष = 2010- किंग जी एलेवन पंजाब, मॅच- 14, रन- 255, विकेट-5

वर्ष = 2011- पुणे वॉरियर्स इंडिया, मॅच- 14, रन- 343,      विकेट- 9

वर्ष = 1012- पूर्ण वर्ष खेळले नाहीत.

 वर्ष = 2013- पुणे वॉरियर्स इंडिया, मॅच- 13, रन- 238, विकेट-6

वर्ष = 2014- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मॅच- 14, रन- 376, विकेट- 5

वर्ष = 2015- दिल्ही डेडेवल्स, मॅच- 14, रन- 248              विकेट- 1

वर्ष = 2016- सनराईज हैद्राबाद, मॅच- 10, रन- 236        विकेट- 0

वर्ष = 2017- सनराईज हैद्राबाद, मॅच- 12, रन- 252,                 विकेट- 1

वर्ष = 2018- किंग जी एलेवन पंजाब, मॅच- 8, रन- 65      विकेट- 0

वर्ष =2019- मुंबई इंडियन्स, मॅच- 4, रन- 98,                 विकेट- 0

युवराज सिंह जीवनचरित्र (Yuvraj Singh Biography in Marathi)

युवराज सिंह यांच्या जीवन प्रवासा बद्दल थोडक्यात माहिती

युवराज सिंह हा भारतीय क्रिकेट टीमचा महत्वाचा डाव्या हाताचा खेळाडू आहे. भारतीय माझी वेगवान गोलंदाज आणि फिल्म अभिनेते योगीराज सिंह हे त्यांचे वडील आहेत तर आईचे नांव शबनम सिंह आहे. लहानपापासूनच आपल्या वडिलांना क्रिकेट खेळताना बघून युवराज सिंह यांच्या मनात क्रिकेट बद्दल प्रेम आपुलकी निर्माण झाली आणि आपणही वडीलांसारखेच क्रिकेटर बनायचे त्यांनी ठरवले.

 युवराज सिंह हे डी.ए. व्हीं पब्लिक शाळेत शिकत होते. आणि ते रोरल स्केटिंग हा खेळ ते उत्तम खेळायचे आणि त्यांनी राष्ट्रीय चवदा वर्षा खालील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. परंतु युवराज सिंह यांच्या वडिलांना वाटायचे युवराज हा मोठा क्रिकेटर व्हावा कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यामधील क्रिकेट जवळून बघितले होते.

युवराज यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेट ची तयारी सुरू केली. आणि नंतर काही दिवसांनी युवराज हे एक चांगले फलंदाज म्हणून पुढे आले, आणि नंतर 1995-1996 मध्ये त्यांना पंजाब च्या सोळा वर्षांच्या खालील संघात घेण्यात आले. या संघात केलेल्या उतुंग कामगिरीच्या जोरावर युवराज यांना पंजाब संघाच्या एकोणीस वर्षांच्या खालील संघात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने करून दाखवले.

आणि त्यानंतर पुढे जाऊन 2000 साली त्यांना भारतीय वनडे टीमच्या एकोणीस वर्षा खालील वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि तिथे ही संधीच सोन करत त्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब पटकाविला.

 त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर लोकांना इतकं प्रभावित केले की त्यांना आयसीसीच्या नॉक आऊट ट्रॉफीत भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात खेळायला मिळाले. अणि नंतर मग 3 ऑक्टोबर 2000 मध्ये त्यांनी केन्या संघा विरुद्ध पदार्पण केले. नंतर पुढे जाऊन सलग तीन वर्षे ते फक्त वनडे सामनेच खेळले.

16 ऑक्टोंबर 2003 साली युवराज यांनी न्युझीलंड विरुद्ध कसोटी पदार्पण केले. अणि त्या नंतर युवराज यांनी पुन्हा माघे वळून कधी  पाहिलेच नाही ते भारतीय संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून त्यांची जागा संघात झाली होती.

भारतीय संघ वर्ल्ड कप खूप वाईट अवस्थेत हरल्यामुळे भारतीय संघाची कमान महेंद्र सिंग धोनी यांचेकडे देण्यात आली तर उप कर्णधार पदाची कमान युवराज सिंह यांच्याकडे देण्यात आली. 2007 साली एक नवीन फॉरमॅट क्रिकेटच्या खेळात आला तो म्हणजे t20 फॉरमॅट आणि या पहिल्याच त20 वर्ल्ड कप मध्ये एक चांगली कामगिरी करत भारतीय संघाने किताब आपल्या नावावर केला, याच t20 वर्ल्ड कपच्या एका सामन्यात युवराज यांनी इंग्लंडच्या ट्रेड ब्रॉड ला सहा चेंडूत सहा षटकार खेचत इतिहास रचला. तर 12 चेंडूत आर्ध शतक करण्याचा विक्रम ही स्वतःच्या नावे केला. असा विक्रम करणारे ते जगातील पहिलेच फलंदाज होते.

2008 साली बीसीसाय ने इंडियन प्रीमियर लीग( ipl ) सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी युवराज यांना किंग जी  इलेवन पंजाब संघाने आपल्या ताफ्यात सामिल करुन घेत त्यांच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली. त्या वर्षी त्यांनी पंधरा मॅच खेळत 299 धावा काढल्या आणि 3 विकेट ही मिळवल्या.

2009 साली पुन्हा एकदा युवराज किंग जी ईलेवन पंजाब संघाकडूनच खेळत 14 मॅच मध्ये 340 धावा तर 6 विकेटही आपल्या नावावर केल्या. त्याचं वर्षी युवराज यांनी 16 षटकार आणि 25 चौकार मारले होते.

2010 मध्ये पुन्हा एकदा युवराज सिंह किंग जी ईलेवन पंजाब संघाकडूनच खेळत 14 मॅच मध्ये 255 धावा तर 5 विकेट हि मिळवल्या. त्याचं वर्षी युवराज यांनी 14 षटकार आणि 20 चौकार मारले होते.

युवराज सिंह हे इंडियन प्रीमियर लीग( ipl ) मध्ये सर्वात       महाग विकले गेलेले खेळाडू आहेत. 2015 मध्ये दिल्ही डेडेवल्स या संघाने युवराज वर 1600 कोटी रुपयांची बोली लाऊन आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले ही इंडियन प्रीमियर लीग( ipl ) मधील सर्वात मोठी पहिलीच बोली आहे.

2011 वर्ल्ड कप च्या एक महिना अगोदर युवराज ला श्वास घेताना त्रास होऊ लागला तेंव्हा त्यांनी अपल्या डॉक्टरांना त्याबद्दल सांगितले तेंव्हा डॉक्टरांनी युवराज ला काही मेडिकल टेस्ट करून घेण्यास सांगितले, परंतु वर्ल्ड कप तोंडावर आल्याने युवराज याने त्याकडे दुर्लक्ष करून वर्ल्ड कप वर फोकस केला. युवराज ला वर्ल्ड कप सुरू असताना त्रास होत असूनही युवराज देशासाठी खेळत राहिला फक्त खेळला नाही तर आपल्या ब्याटने त्याने चांगली कामगिरी केली आणि गोलंदाजी ही खूप चांगली करत 4 वेळा मेन ऑफ द मॅच आणि मेन ऑफ द सिरीज बनला. भारतीय संघाला या वाघाने वर्ल्ड कप मिळवून दिला.

युवराज सिंह यांची तब्येत बिघडत चालली होती आणि त्यानंतर त्यांनी मेडिकल टेस्ट केली तेंव्हा समजले युवराज यांना स्टेज 1 चा कॅन्सर झाला आहे हि बातमी युवराज यांच्या चाहत्यांना समजली तेव्हा ते खुप दुःखी झाले, पण युवराज यांनी न घाबरता या आजाराचा सामना केला, दुसऱ्या देशात जाऊन त्यांनी त्यावर उपचार घेतले. पुन्हा 2012 साली युवराज यांनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. परंतु कॅन्सर सारख्या आजारामुळे त्याच्या खेळात थोडी घसरण झाली आणि त्यांचे संघातील पद ते कायमचे टिकवू शकले नाहीत.

युवराज सिंह यांनी जून 2019 मध्ये क्रिकेटला अखेरचा रामराम केला त्यांनी निवृत्ती घेतली.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रीणींना आपली माहिती फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments