Ticker

6/recent/ticker-posts

वीरेंद्र सेहवाग जीवनचरित्र ( virendra sehwag biography)


 हॅलो मित्रांनो आज आपण वीरेंद्र सेहवाग जीवनचरित्र ( virendra sehwag biography) बद्दल माहिती देणार आहे ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

मुल्तान चा सुल्तान नजबगडचा नवाब अशी ओळख मिरवणारा आपल्या सर्वांचा आवडता क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग. त्यांची विरू या नावाने जगभर ओळख होती. विरू च नुसतं नाव घेतलं तरी अनेक मोठ मोठे गोलंदाज त्याला घाबरतात पहिल्या चेंडूवर चौकार षटकार मारून तो आपल्या खेळाची सुरुवात करायचा. सचिन आणि दादा हि जगातील सर्वांत भारी ओपनिंग जोडी धुमाकूळ घालत असताना त्यानी आपली ओपणर म्हणुन ओळख निर्माण केली. टेस्ट असो किंवा वनडे विरू पहिल्या चेंडूवर चौकार षटकार मरणारच त्यावर अनेक सट्टेबाजांनि सट्टे लावले आणि जिंकले सुद्धा. त्या काळी सचिन दादा अणि द्रविड आऊट झाले की मॅच संपायची त्या वेळी एक वाघ आला आणि भारताची फलंदाजी आणखी मजबूत झाली तो म्हणजे आपला विरू. वाघ आपली शिकार कमजोर आहे की ताकतवर हे बघत नाही तो फक्त हल्ला करून फडशा पाडतो सेहवाग ही तेच करायचा गोलंदाज कुणीही असो मैदान कोणतंही असो आपली बॅटिंग पहिली असो की दुसरी तो पहिल्या चेंडू पासून गोलंदाजांवर तुटून पडायचा. अशाच महान क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांच्या जीवनचरित्र बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत.

पूर्ण नाव= वीरेंद्र सेहवाग

जन्मतारीख= 20 ऑक्टोंबर 1978

जन्मगाव= हरियाणा

फलंदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रिय वनडे करिअर= सामने- 229, धावा- 7434, सर्वोच्च धावसंख्या- 146, बळी- 92, सर्वोत्तम कामगीरी- 4/6

आंतरराष्ट्रिय कसोटी करिअर= सामने- 78, धावा- 7694, सर्वोत्तम धावसंख्या- 319, बळी- 39, सर्वोत्तम कामगिरी- 5/104

सुरुवातीचे जीवन  

वीरेंद्र सेहवाग यांचा जन्म 20 ऑक्टोंबर 1978 मध्ये दील्हीच्या नजबगढ मध्ये जाट कुटुंबात झाला. वीरेंद्र सेहवाग यांच्या वडिलांचे नाव किसन सेहवाग आणि आईचे नाव कृष्णा सेहवाग होते. ते एकत्रित कुटुंबात वाढले त्यात त्यांचे काका काकी त्यांची मुले त्यात ते राहत होते. सेहवाग आपल्या चार भाऊ बहिणींन मध्ये तिसऱ्या नंबर चे होते दोन मोठ्या बहिणी अणि एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार होता. वडिलांनी सेहवाग यांचा दाखला दिल्ही च्या अरुड विद्यालयात केला त्याच्या नंतर त्यांचे मन क्रिकेट कडे वळले त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले मला क्रिकेट खेळायचे आहे.

परंतू त्यांच्या वडिलांना वाटायचे त्यांनी क्रिकेट बरोबर शिक्षण सुद्धा घेतले पाहिजे. लहानपणी क्रिकेट खेळताना वीरेंद्र सेहवाग यांचा एक दात तुटला होता हे बघून त्यांच्या वडिलांनी त्यांचे क्रिकेट खेळणे बंद केले. परंतू आपल्या आईच्या मदतीने वडिलांना सांगून परत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुढे ते दहावी ची परीक्षा पास झाले आणि दहावी नंतर त्यांनी क्रिकेट खुप मनावर घेतले आणि काहीही झाले तरी आता क्रिकेट खेलयचेच असे ठरवले करिअर करायचं तर ते क्रिकेट मध्येच. त्यांनी नजबगड मध्ये जवळच्याच एका क्रिकेट अकादमी मध्ये जायला सुरुवात केली तिथे कोच सशी काळे यांनी सेहवाग चा खेळ बघून सेहवाग ला प्रोत्साहन दिले तु खुप पुढे जाशील असे सांगितले.

तेंव्हा सेहवाग ने त्यांना विचारले पुढे कुठे जाऊ मग त्यांनी सांगितले जिथे खुप सिरियस क्रिकेट खेळतात तिथे जा तुला तिथून पुढे जाण्याची संधी मिळेल. तेंव्हा त्यांनी सेहवाग यांना बारावीच शिक्षण घेण्यासाठी सरकारी शाळेत पाठवले. तेंव्हा तिथे कोच होते ए एन शर्मा ते त्या वेळेस नॅशनल टीम चे पण सिलेक्टर होते. सेहवाग सांगतात सुरुवातीचे तीन दिवस त्यांनी मला फक्त लाईनीत उभा केले. मला बॅटिंग करायला मिळाली नाही आणि बॉलिंग करायला मिळाली नाही. चौथा दिवशी फक्त मला चार चेंडू खेळायला मिळाले आणि मला बाहेर बोलावण्यात आले तेंव्हा मी सरांना विचारल अस का तेंव्हा सरांनी मला सांगितलं की पहिल्या तीन दिवस मि तुमची क्रिकेट बद्दल तळमळ बघत होतो.

जमला मिलिया इस्लामिया अकादमी मध्ये प्रवेश घेतला की तिथून ते डायरेक्ट चयन कर्त्याच्या नजरेत यावेत तेथून मग ते मद्रास क्रिकेट क्लब मध्ये भरती झाले. तिथे त्यांचे कोच होते सतीश शर्मा ते सेहवाग यांचा खेळ बघून खुप प्रभावित झाले कसा काय हा खेळाडू अजून एकोणीस वर्षां खालील गटात सामिल झाला नाही मग त्यांनी एक सामना ठेवला देल्ही वर्सेस जमिया 11 यांच्यात ठेवला आणि सेहवाग यांना सांगितले तुमची ही शेवटची संधी आहे सेहवाग अशाच एका संधीची वाट पाहत होते त्यांनी ही संधी हातची जावू दीली नाही अणि त्या मॅच मध्ये त्यांनी 140 पेक्षा जास्त धावा केल्या त्यात त्यांनी 17 षटकात मारले.

हे बघून त्यांना दिल्हि क्रिकेट टीम मध्ये सामिल करून घेतले. वर्ष 1997 मध्ये त्यांना पहिल्यांदा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यांना दिलीप ट्रॉफी खेळण्यासाठी नॉर्थ झोन टीम मध्ये जागा मिळाली तिथे त्यांनी खुप जबरदस्त खेळ करून आपली ताकद आणखी वाढवली. मग वर्ष 1998 मध्ये त्यांना एकोणीस वर्षां खालील वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय करिअर 

शेवटी तो दिवस आलाच 1 एप्रिल 1999 मध्ये त्यांना पहिल्यांदा भारतीय संघाची जर्सी परिधान करायची संधी मिळाली. 1 एप्रिल 1999 मध्ये त्यांनी पाकिस्तान विरुद्ध एकिवसीय सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय करिअर ला सुरुवात केली. पण त्या सामन्यात त्यांनी खूप खराब प्रदर्शन करत एका धावेवर शोएब अख्तर यांच्या समोर एल बी डब्लिव आऊट झाले. गोलंदाजीत सुद्धा ते चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. 3 षटकात 35 रन देत एकही विकेट मिळवू शकले नाहीत. म्हणुन त्यांना संघातून काढून टाकण्यात आले.

पुढे त्यांना पुन्हा संधी मिळाली वर्ष 2000 मध्ये होणार असलेल्या झिम्बाब्वे विरूद्ध सिरीज मध्ये त्यांना खूप प्रभाव पाडण्याची संधी मिळाली नाही. म्हणुन निवड समितीने 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध संधी दिली. त्या सिरीज मधील पहिल्याच सामन्यात त्यांनी 54 चेंडूत 58 धावा करून निवड समितीचा निर्णय योग्य करून दाखवला. गोलंदाजीत सुद्धा त्यांनी 9 ओव्हर मध्ये 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या त्यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया ला 60 धावांनी पराभूत केले. त्या सामन्यात त्यांना मेन ऑफ द मॅच हा किताब मिळाला.

2001 मध्ये तीन देशान मध्ये होणाऱ्या एकिवसीय सिरीज मध्ये त्यांना सामिल करून घेतले. त्यात भारत, श्रीलंका, आणि न्युझीलंड खेळणार होते त्याचं सिरीज मध्ये न्युझीलंड विरूद्ध सचिन तेंडुलकर यांच्या अनुपस्थित सलामीला खेळण्याची संधी मिळाली संधीच सोन करत त्यांनी 69 चेंडूत 100 धावा केल्या त्यात 19 चौकार आणि 1 षटकार सामिल होते. अणि आपले पहिले एकिवसीय शतक झळकावले. त्यांच्या या अद्भूत खेळाच्या जोरावर भारताने न्युझीलंड ला 7 विकेट ने हरवले या सामन्यात पुन्हा एकदा मेन ऑफ द मॅच बनले. ते भारतीय संघाचे कायम स्वरूप खेळाडू बनले.

वर्ष 2003 मध्ये त्यांना साऊथ आफ्रिका विरुद्ध टेस्ट क्रिकेट मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याचं सामन्यात त्यांनी 105 धावांची धमाकेदार खेळी केली. त्या नंतर त्यांनी कधीही माघे वळून पाहिले नाही खुप मोठ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले भारतीय संघाला खुप सामने जिंकून दिले. त्यांना 2003 मध्ये होणाऱ्या विश्व चषक टीम मध्ये सामिल करून घेतले. त्यात त्यांना सचिन तेंडुलकर यांच्या बरोबर ओपन करण्याची संधी मिळाली त्यात त्यांचे प्रदर्षण चांगले राहिले फायनल मध्ये त्यांनी  केलेल्या 82 धावा कामी आल्या नाहीत आणि भारत ऑस्ट्रेलिया विरूद्ध हरला.

सेहवाग यांचा खेळ दिवसेंदिवस सुधारत चालला होता त्यांनी खूप किर्तीमान आपल्या नावावर केले. सेहवाग यांच्या येण्याने सचिन तेंडुलकर यांचा ओझ खुप कमी झाले होते. सेहवाग हे खुप आक्रमक फलंदाज म्हणुन ओळखले जायचे. त्यांची ओळख पहिल्याच चेंडूवर चौकार षटकार मारणारा खेळाडू म्हणुन होती. 2004 मध्ये त्यांनी पाकिस्तान विरुद्ध अविस्मरणीय कामगीरी करत पाकिस्तान मध्ये 309 धावांची खेळी केली. तिहेरी शतक मारणारे ते पहिले भारतीय खेळाडू बनले. सेहवाग यांच्या जीवनात पण तो दिवस आलाच जो सर्व खेळाडूंच्या आयुष्यात कधी न कधी येतोच खराब फॉर्म 2005 पासून त्यांच्या ब्यात मधून रन येने बंद झाले आणि त्यांना खंद्याचे दुखणे पण झाले. 

वेळ आली 2007 विश्व चषक खेळण्याची त्यांच्या खराब फॉर्म मुळे त्यांना संघात स्थान मिळाले नाही. पण राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली.

आयपीएल करिअर

वीरेंद्र सेहवाग हे 2008 पासून 2015 पर्यंत आयपीएल खेळले त्यात त्यांनी खुप चांगली कामगीरी करून दाखवली आहे त्यांनी आपल्या आयपीएल करिअर ला 2008 पासून केली 2008 मध्ये ते देल्ही डेरडेवल्स संघाकडून खेळले होते.

वर्ष= 2008, सामने- 14, रन 406, सर्वाधिक धावा- 94, चौकार- 46, षटकात- 21, अर्धशतके- 3, शतके- 0


वर्ष= 2009, सामने- 11, रन 150, सर्वाधिक धावा- 50, चौकार- 24, षटकात- 07, अर्धशतके- 1, शतके- 0


वर्ष= 2010, सामने- 14, रन 356, सर्वाधिक धावा- 75, चौकार- 47 , षटकात- 14, अर्धशतके- 3, शतके- 0


वर्ष= 2011, सामने- 11, रन 424, सर्वाधिक धावा- 119, चौकार- 51, षटकात- 18, अर्धशतके- 2, शतके- 1


वर्ष= 2012, सामने- 16, रन 495, सर्वाधिक धावा- 87, चौकार- 57, षटकात- 19, अर्धशतके- 5, शतके- 0 


वर्ष= 2013, सामने- 13, रन 295, सर्वाधिक धावा- 95, चौकार- 41, षटकात- 06, अर्धशतके- 1, शतके- 0 


वर्ष= 2014, संघ- किंग जी एल्हेवन पंजाब, सामने- 17, रन 455, सर्वाधिक धावा- 122, चौकार- 56, षटकात- 18, अर्धशतके- 1, शतके- 1


वर्ष= 2015, सामने- 08, रन 99, सर्वाधिक धावा- 47, चौकार- 12, षटकात- 03, अर्धशतके- 0, शतके- 0 


मिळालेले पुरस्कार

 वर्ष= 2002- अर्जुन पुरस्कार मिळाला होता.

वर्ष= 2008- विस्डेन अग्रगण्य क्रिकेटर

वर्श= 2010- कसोटी प्लेअर ऑफ द इयर 

वर्ष= 2010- पद्मश्री पुरस्कार


मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.
Post a Comment

0 Comments