Ticker

6/recent/ticker-posts

व्हि. व्हि. एस. लक्ष्मण जीवनचरित्र (v. v. s. Laxman biography)

 व्हि. व्हि. एस. लक्ष्मण यांचे जीवनचरित्र (v. v. s. Laxman biography) बद्दल माहिती देणार आहे ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा. 

वंगीपुरप्पू व्यंकटा साई लक्ष्मण म्हणजेच आपला वेरी वेरी स्पेशल लक्ष्मण आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लक्ष्मण ची खुप मोठी ओळख आहे. जगभरात लक्ष्मण यांचे खुप चाहते आहेत लक्ष्मण हे वेरी वेरी स्पेशल या त्यांच्या टोपण नावाने जगभर प्रसिद्ध आहेत. लक्ष्मण यांना ओळखत नाही असा एकही माणूस आपल्या भारतामध्ये सापडणार नाही. लक्ष्मण हे भारतीय फलंदाजीचा एक महत्वपूर्ण भाग म्हणुन ओळखले जायचे. लक्ष्मण यांच्या शिवाय भारतीय संघ अपूर्णच वाटायचा त्या काळी कांगारूंना घाम फोडणारा लक्ष्मण हा एकच वाघ होता. ऑस्ट्रेलियन टीम समोर दिसली कि त्यांच्यावर लक्ष्मण तुटून पडायचा. लक्ष्मण ची आणखी ओळख सांगायची म्हटलं तर तो खुप प्रेमळ दयाळू स्वभावाचा होता. आपल्या मागे कितीही गरबड असली तरी अंघोळ केल्या शिवाय मैदानात उतरायचा नाही ही त्याची खासियत होती. मॅच सुरू होण्या आधी ड्रेसिंग रूम मध्ये देवाची पूजा मांडणाऱ्या पाप भिरू लक्ष्मण बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत. 


पूर्ण नाव= वंगीपुरप्पू व्यंकटा साई लक्ष्मण 

जन्म= 1 नोव्हेंबर, 1974

जन्मठिकाण= हैद्राबाद 

फलंदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= उजव्या हाताचा गोलंदाज 


व्हि. व्हि. एस लक्ष्मण यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

व्हि. व्हि. एस लक्ष्मण यांचा जन्म 1 नोव्हेंबर, 1974 मध्ये आंध्रप्रदेश मधील हैद्राबाद या ठिकाणी झाला. त्यांचे संपूर्ण नाव वंगीपुरप्पू व्यंकटा साई लक्ष्मण हे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव डॉक्टर व्हि शांताराम आणि आईचे नाव डॉक्टर व्हि सत्यभामा आहे त्यांचे आई आणि वडील दोघेही फिजिसियन आहेत. त्यांना एक भाऊ सुद्धा आहे. लक्ष्मण हे भारताचे दूसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण याचेचं वंशज आहेत. लक्ष्मण यांनी आपले प्राथमिक शिक्षण लिटिल हाय्कूल येथून घेतले आहे. पुढे त्यांनी मेडिकल शिक्षण घेण्यासाठी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. परंतू त्यांना क्रिकेट बद्दल तळमळ असल्यामुळे त्यांनी क्रिकेट मध्येच आपले करिअर करायचे ठरविले.

त्यांना 1992- 93 मध्ये हैद्राबाद टीम कडून पंजाब विरुद्ध पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात ते झिरो या धाव संख्येवर बाद झाले तर दुसऱ्या सामन्यात फक्त 17 धावा करता आल्या. त्याचं वेळेस त्यांची निवड भारताच्या एकोणीस वर्षां खालील संघात सुद्धा झाली. फेब्रुवारी 1994 मध्ये लक्ष्मण त्यांना ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिला सामना खेळायला मिळाला. त्या सामन्यात त्यांनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला करताना 88 धावांची चांगली खेळी केली. चांगल्या फॉर्म ला कायम ठेवत त्यांनी दुसऱ्या सामन्यात 77 धावांची खेळी केली.

एकोणीस वर्षां खालील गटात ऑस्ट्रेलिया विरूद्ध केलेल्या उत्तम कामगीरी मुले त्यांना 1993-94 मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी हैद्राबाद संघाला अनेक सामने जिंकून दिले 1996 मध्ये त्यांना साऊथ आफ्रिका विरुद्ध प्लेइंग15 मध्ये जागा मिळाली. त्यांनी 20 नोव्हेंबर, 1976 मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. पहिल्या डावात 11 धावा तर दुसऱ्या डावात 51 धावांची अर्धशतकी खेळी केली आणि साऊथ आफ्रिका सारख्या मजबूत संघाला मात दिली. वर्ष 1997 मध्ये त्यांना वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करण्याची संधी दिली. 

वर्ष 1998 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध कोलकत्ता मधील सामन्यात त्यांनी नवज्योत सिद्धू बरोबर डावाची सुरुवात करताना 95 धावांची धमाकेदर खेळी केली. त्या सामन्यात सिद्धू ने 97 रन केले होते. या दोघांच्या खेळाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्ध 219 धावांनी सामना जिंकला. परत त्यांना 1998 मध्ये न्युझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सुद्धा सामिल करून घेण्यात आले. पण त्या सिरीज मध्ये अजय जडेजा यांना प्राथमिकता देण्यात आली अणि त्यांनीच डावाची सुरुवात केली त्यामुळे लक्ष्मण यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

वर्ष 1998 मध्ये त्यांना पेप्सी ट्राय सिरीज मध्ये झिंबाब्वे विरूद्ध एकिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. त्यात सुद्धा त्यांनी खुप खराब प्रदर्शन केले. आणि एकही धाव न करता बाद झाले त्यानंतर त्यांना संघातून ड्रॉप करण्यात आले. एक उत्कृष्ठ खेळाडू असुन सुद्धा लक्ष्मण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हवे तसे प्रदर्शन करत नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा घरेलु क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुन्हा त्यांना ऑस्ट्रेलिया विरूद्ध दौऱ्यावर संघात स्थान देण्यात आले. त्यांनी सिडनी मध्ये खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात करताना ग्लेन मॅग्रा, शेन वॉर्न, ब्रेट ली, यांसरख्या उत्कृष्ठ गोलंदाजांचा सामना करून 167 धावांची शानदार खेळी केली.

दुसरे भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजी समोर टिकू शकले नाहीत आणि भारत तो सामना 141 धावांनी पराभूत झाला. त्यानंतर लक्ष्मण स्वाता हून एक वर्ष कसोटी टीममधून बाहेर राहिले अणि फक्त घरेलु क्रिकेट खेळत राहिले. त्यांना वर्ष 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले आणि त्यांना संघात स्थान देण्यात आले. त्या वेळी सौरभ गांगुली दादा भारतीय संघाचे नेतृत्व करत होते. मुंबई मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियने भारताला 10 विकेट ने पराभूत केले. भारताला तो सामना हरवून ऑस्ट्रेलिया सलग 16 सामने अपराजित झाली होती.

पुढचा सामना कोलकत्ता मधील ईडन गार्डन मैदानावर होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत कर्णधार स्टीव वॉ च्या शतकी खेळीच्या जोरावर 445 धावांचा डोंगर उभा केला. त्या धावांचा पाठलाग करताना पूर्ण भारतीय संघ अवघ्या 175 धावांवर बाद झाला. त्यात सर्वात जास्त 59 धावा एकट्या लक्ष्मण याने बनवल्या होत्या. ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव वॉ ने भारताला फॉलो ऑन खेळण्यासाठी बोलावले भारताची सुरुवात चांगली झाली नाही दोन्ही सलामीचे फलंदाज 97 धावांवर बाद झाले. तेंव्हा मैदानात आला लक्ष्मण 10 रन जोडत सचिन तेंडुलकर सुद्धा तंबूत परतले.

त्यानंतर मैदानात आले कर्णधार सौरभ गांगुली या दोघांनी 117 धावांची भागीदारी करून संघाला सावरले सौरभ गांगुली आऊट झाले आणि भारतीय संघ मध्येच फसला. त्यानंतर लक्ष्मण ची साथ देण्यासाठी आले राहुल द्रविड त्यानंतर जे घडले तो आजही एक इतिहासच त्यात लक्ष्मण यांनी 281 धावांची खेळी करून 657 धावांचा विशाल स्कोर केला ऑस्ट्रेलिया 212 धावांवर पूर्ण संघ बाद झाला. आणि भारताने तो सामना 171 धावांनी जिंकला. तेंव्हा पासून लक्ष्मण ऑस्ट्रेलियन कांगारूंच्या शिकारी साठी ओळखला जाऊ लागला. 

2008 साली झालेल्या आयपीएल मध्ये ते डेक्कन चार्जर संघाकडून खेळले होते. ते डेक्कन चार्जर संघाचे कर्णधार होते. आयपीएल मध्ये त्यांचा खेळ त्यांच्या नावाला साजेसा झाला नाही म्हणुन त्यांनी कर्णधार पदाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज याडम गिलख्रिस्ट यांच्याकडे सोपवली.

अखेर त्यांनी 18 ऑगस्ट, 2012 मध्ये खेळांच्या तीनही फॉरमॅट मधून निवृत्ती घेतली.


मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.
Post a Comment

0 Comments