Ticker

6/recent/ticker-posts

सचिन तेंडुलकर जीवनचरित्र Sachin Tendulkar Biography in Marathi


हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला सचिन तेंडुलकर यांच्या जीवनचरित्र (sachin tendulkar Biography in Marathi) बद्दल माहिती सांगणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
आज आपण अशा एका क्रिकेटर बद्दल पाहणार आहोत ज्याला आपण सर्वजण क्रिकेटचा देव म्हणून ओळखतो आणि तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता क्रिकेटर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या 
 जीवनचरित्र बद्दल आपल्या लेखात महिती बघरणार आहोत.
भारतातच नाही तर संपुर्ण जगात सचिन यांची क्रिकेटर म्हणून खूप मोठी ओळख आहे. सचिन तेंडुलकर यांचा सर्वच गोलंदाजांवर धाक होता आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या नावावर सर्वात ज्यास्त धावा काढण्याचा विक्रम आहे. त्याबरोबरच सर्वात ज्यास्त शतके मारण्याचाही विक्रम त्यांचेच नावे आहे. सचिन तेंडुलकर खेळायचेच असे की त्यां by चा जन्मच क्रिकेट खेळण्यासाठी झाला आहे आणि म्हणूनच त्यांना क्रिकेटचा देव असे म्हणतात. चला तर जाणून घेऊया क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या जीवन जीवनचरित्रवीषयी माहिती.
 
संपूर्ण नाव= सचिन रमेश तेंडुलकर 

जन्म= 24 अप्रैल 1973 

जन्म गाव= मुंबई 

फलंदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= उजव्या हाताचा गोलंदाज 

 आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण= 18 डिसेंबर 1989 भारत वी पाकिस्तान

आंतरराष्ट्रिय टेस्ट पदार्पण= 15 नोव्हेंबर 1989 भारत वी पाकिस्तान

आंतरराष्ट्रिय टी20 पदार्पण= 1 डिसेंबर 2006 भारत वी दक्षिण आफ्रिका

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द = सामने- 200, रन- 15921, विकेट- 46

 आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द = सामने- 463, रन- 18426, विकेट- 154

सचिन तेंडुलकर आयपीएल करिअर

वर्ष= 2008- मुंबई इंडियन्स, मॅच- 7, रन- 188, अर्धशतके- 1, शतके- 0, चौकार- 26, षटकार- 2

वर्ष= 2009- मुंबई इंडियन्स, मॅच- 13, रन- 364, अर्धशतके- 2, शतके- 0, चौकार- 39, षटकार- 10

वर्ष= 2010- मुंबई इंडियन्स, मॅच- 15, रन- 618, अर्धशतके- 5, शतके- 0, चौकार- 86, षटकार- 03

वर्ष= 2011- मुंबई इंडियन्स, मॅच- 16, रन- 553, अर्धशतके- 2, शतके- 1, चौकार- 67, षटकार- 05

वर्ष= 2012- मुंबई इंडियन्स, मॅच- 13, रन- 324, अर्धशतके- 2, शतके- 0, चौकार- 39, षटकार- 04

वर्ष= 2013- मुंबई इंडियन्स, मॅच- 14, रन- 287, अर्धशतके- 1, शतके- 0, चौकार- 38, षटकार- 05

सचिन तेंडुलकर संपूर्ण जीवनचरित्र (sachin tendulkar biography in Marathi) माहती

सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24, एप्रिल 1973 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला. रमेश तेंडुलकर हे सचिन यांचे वडिल होते तर रजनी तेंडुलकर हया त्यांच्या आई होत्या सचिन तेंडुलकर हा रमेश तेंडुलकर यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे, सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांनी त्यांचे आवडते गायक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून सचिन हे नाव ठेवले. सचिन तेंडुलकर हे फक्त दहावी शिकले आहेत. सचिन तेंडुलकर यांनी 24 मे 1995 मध्ये डॉक्टर अंजली यांच्याशी विवाह केला त्यांना दोन मुले आहेत मुलगी सारा हीचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये झाला तर मुलगा अर्जुन याचा जन्म 24 सप्टेंबर 1999 मध्ये झाला.

सचिन तेंडुलकर हे लहानपणी खूप मस्तीखोर होते त्यांची सारखी इतर मुलांबरोबर भांडण होत असे सचिन तेंडुलकर यांचा खोडसरपणा कमी करण्याठी त्यांचा मोठा भाऊ अजित यांनी क्रिकेट अकादमी भरती करण्याचे ठरवले आणि सचिन यांना रमाकांत आचरेकर यंच्या अकादमी ला भरती केले त्या वेळेस रमाकांत आचरेकर हे प्रसिद्ध कोच म्हणून ओळखले जायचे. परंतू सचिन आचरेकर यांच्या समोर चांगली कामगीरी करू शकले नाहीत म्हणून त्यांना शिकवण्यास अचारेकरांनी नकार दिला पण सचिन यांचा मोठा भाऊ अजित यांच्या विनंती वरून सचिनचा पुन्हा एकदा खेळ बघितला सचिन हा एक चांगला खेळाडू आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी सचिनला शिकवायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकर यांनी प्राथमिक शिक्षण श्रध्दा आश्रम विद्या मंदिर मधून घेतले. पुढे 1988 मध्ये सचिन तेंडुलकर ने सेंट झेविअर च्या विरोधात 646 धावांची भागीदारी आपला मित्र विनोद कांबळी यांच्यासोबत केली.

याच भागीदारीची दखल प्रसार माध्यमांनी घेतली आणि पुढे जाऊन आपल्या पहिल्याच रणजी सामन्यांत सचिन ने खणखणीत शतक ठोकले आणि क्रिकेटमधल्या दिगज्यांना अपली दखल घेण्यास भाग पाडले भारतीय एकोणीस वर्षांच्या खालील गटात त्याची निवड झाली नाही तेंव्हा स्व:ता सुनिल गावसकर यांनी त्याला पत्र लीहले आणि त्याचा उत्साह वाढवला आणि त्याच काळात वेस्ट इंडीज दैवर्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सचिन तेंडुलकर यांची निवड होईल अशी चर्चा होती परंतु सोळा वर्षाचा सचिन वेस्ट इंडिज च्या आक्रमक गोलंदाजीचा सामना कसा करू शकेल हिच चिंता निवड करणाऱ्यांना होती. म्हणून सचिनला वेस्ट इंडिज दैवर्यातून वगळण्यात आले.

अखेरीस 15 नोव्हेंबर 1989 मध्ये सोळा वर्षाचा हा लहान मुलगा पाकिस्तान दौवर्यासाठी निवडला गेला त्या मालिकेत तीन कसोटी सामने अनिर्णित ठरले आणि चौथ्या कसोटी सामन्यात सचिनला वखार युनिस च्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करताना नाकावर जोरदार चेंडू लागला, आणि त्याच्या नाकातून रक्ताची धार वाहू लागली तरीही आपली जिद्द न हारता तो मैदानात उभा राहिला आणि मग वखार युनिस, वसीम अक्रम, इम्रान खान या त्या कालच्या तीनही आक्रमक गोलंदाजांचा सामना करून त्यांच्या समोर 57 धावांची खेळी केली. आणि तो सामना अनिर्णित करण्यात आपला सोळा वर्षाचा सचिन यशस्वी ठरला.

अब्दुल कादीर सारख्या कसलेल्या गोलंदाजाला एका ओव्हर मध्ये चार षटकार लावणाऱ्या सचिन तेंडुलकरचे कौतुक करावे तेवढे थोडेच कसोटी कारकिर्तीला सुरूवात करणारा सचिन तेंडुलकर 1990 मध्ये इंग्लंड दौवर्यावर गेला होता तीतेही आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने आपल पाहिलं शतक झळकावले त्याच सामन्यात सचिन 119 धावा काढत नाबाद राहिला.

1992 मध्ये ऑस्ट्रेलिया दौवर्यावर सचिनने दोन शतके झळकावली ज्यामध्ये पर्थ च्या मैदानावरील अनेक भारतीय मोठे मोठे खेळाडू अपयशी ठरले तिथेच सचिनने झळकावलेले शतक आजही ऑस्ट्रेलिया चे खेळाडू विसरू शकले नाहीत.

त्यानंतर पुठे जाऊन 1994 साली पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात ओपनिंग करण्यास आलेल्या सचिनने न्यूीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 49 चेंडूत, 84 धावा करून त्याने आपला खेळ दाखवला आणि भारतीय संघात त्याने आपली सलामी विराची जागा निश्चित केली. याच वर्षी त्याने अनेक शतके झळकावली.

1999 च्या विश्व चाषकात सचिनला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला एकीकडे विश्व चाषकाच स्वप्न आणि दुसरीकडे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना मुंबईला परतावे लागले. परंतू त्यांच्या आईने सचिनला परत पाठवले सांगितले तुझी गरज इथे नाही तर संपूर्ण भारत देशाला आहे तू जा आणि सामना खेळ असे सांगितले आणि आईचे हे शब्द ऐकून सचिनने पुन्हा मैदानाकडे धाव घेतली. अणि आपल्या पहिल्याच केण्ण्या विरुद्ध च्या सामन्यात मोठी फटके बाजी करत 140 धावांची शतकी खेळी करून आपल्या वडिलांना श्रध्दांजली अर्पण केली. अणि त्यानंतर शतकी खेळी केल्यावर आकाशाकडे बघून वडिलांचे अभार मानताना सचिनला सर्व जगान पाहिलंय.

भारत सरकारने 1999 मध्ये सचिनला पद्मश्री पुरस्कारा ने सन्मानीत केले सचिन फलंदाजीत तर उत्तम करायचा पण त्याच बरोबर त्याने गोलंदाजि तही अनेक वेळा मान सन्मान पटकाविले पुढे जाऊन 2003 मध्ये झालेला विश्व चषक भारतीय संघाला मिळवून देण्याचं स्वप्न मनाशी बाळगून विश्व चषकात उतरलेला सचिनने पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध सचिनने शोब अख्तर ची इतकी धुलाई केली की त्याने गोलंदाजी करण्यास आपल्या कर्णधाराला नकार दिला त्याच सामन्यात सचिनला मलिकविराचा किताब मिळाला.

2004 साली ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करताना सचिनला पहिल्या दोन सामन्यात 0 बाद व्हावं लागलं मग सचिननं या परिस्थितीचा आढावा घेत भरपूर सराव करून तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच विदेशात 241 धावा चोपत ऑस्ट्रेलियाची भरपूर धुलाई केली. कसोटी सामन्यात सर्वाधिक शतक मारणाऱ्या सुनिल गावसकर यांचा रेकॉर्ड सचिनने 2005 साली मोडीत काढला.

2008 सालची ऑस्ट्रेलियातील पहिली एकिवसीय शतकी खेळी भारतासाठी महत्वपूर्ण ठरली आणि भारताने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली सचिनने केलेल्या कष्टाचे चीज म्हणून भारत सरकारने सचिनला पद्ममभूषण देऊन गौरविण्यात आले. सचिनने 24 फेब्रुवारी 2010 मध्ये एकदिवसिय सामन्यात  नाबाद 210 धावा करून एक वेगळाच विक्रम आपल्या नावर केला.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्या बरोबरच त्याचा t20 सामन्यांत सुद्धा दबदबा होता सचिन खेळत असला की चांगल्या चांगल्या गोलंदाजनाही घाम गाळावा लागत असे. आयपीएल मध्ये सुद्धा सर्वाधिक चौकार लगावण्याचा रेकॉर्ड हि सचिनने आपल्या नावावर केला. आयपीएल 2010 च्या परवात सर्वाधिक धावा पटकावून सचिन हा ऑरेंज कॅप चा मानकरी ठरला.

सचिनने 19 डिसेंबर 2010 साली, एक नवा विश्व विक्रम आपल्या नावावर केला दक्षिण आफ्रिका विरोधात आपले पन्नासावे शतक ठोकले या मालिकेतील त्यांनी केलेली फलंदाजीचा तसेच शतके हि उल्लेखनीय होती. आपल्या माय भूमीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2011 साली, इतिहास रचला गेला, तब्बल अठ्ठावीस वर्षांच प्रतिक्षे नंतर भारताने पुन्हा एकदा विश्व चषकावर आपले नाव कोरले त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचं योगदान महत्त्वाचं होत. 

आता पूर्ण भारत देशाचं लक्ष सचिनच्या शंभराव्या षतकावर लागले होते. आणि त्यामुळेच सचिनवर खूप दडपण होते आणि अखेरीस तो दिवस उजाडलाच 16 मार्च, 2012, मध्ये त्याने बांगलादेश विरुद्ध मीरपूर मध्ये शंभराव शतक ठोकत इतिहास रचला. या शंभर शतकांच्या प्रवासात सचिननं बरच काही कमावलं , चाहत्यांचे प्रेम, मोठ्यांचा आशीर्वाद, विरोधी खेळाडूंची शाबासकी आणि भरपूर प्रसिद्धी, परंतू या यशाला भुलून न जाता तो आजही सर्वांशी नम्रतेने वागतो. कारकिर्दीची सुरुवात करताना वडिलांनी सांगितलेले बोल आजही त्याच्या लक्षात आहेत. हा खेळ नेहमी तुझ्या सोबत नसेल पण तुझ्यातल माणूसपण कायम तुझ्याबरोबर असुदे सचिन आजही पैशा साठी धूम्रपान करणाऱ्या जाहिराती करत नाही. आजही सचिन खूप गरजू लोकांना मदत करतो. सचिन हा शतकानचे शतक करणार पहिला भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर यांच्या नावावर सर्वात जास्त 18000 हजार एकिवसीय धावा काढण्याचा विक्रम आहे. असे करणारा सचिन हा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. सचिननं आपल्या पूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वात जास्त 30000 हजार धावा काढणारा पहिलाच फलंदाज आहे.

मिळालेले मान सन्मान अणि पुरस्कार

सचिनच्या नावावर आगळा वेगळा विक्रम आहे तो म्हणजे टीम हरलेली असताना सुद्धा सहा वेळा मेन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. 2013 मध्ये सचिनच्या अजोड कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्याला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देवून त्याचा सन्मान करण्यात आला. या आगोदर सचिनला अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार अणि अर्जुन पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सचिनला गौरविण्यात आले आहे.

सचिन रमेश तेंडुलकर यांनी 16 नोव्हेंबर 2013 या दिवशी क्रिकेटला अखेरचा रामराम केला त्यांनी निवृत्ती घेतली.

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments