Ticker

6/recent/ticker-posts

राहुल द्रविड जीवनचरित्र (rahul dravid biography)


 राहुल द्रविड यांच्या जीवनचरित्र (rahul dravid biography) बद्दल माहिती बघणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो आपल्या सर्वांचा लाडका राहुल द्रविड. राहुल द्रविड यांनी आपल्या खेळ जीवनात अनेक पराक्रम केले आणि ते मोडलेही. राहुल द्रविड हा आपल्या भारतीयांचा चाहत्यांचा सर्वात आवडता खेळाडू, राहुल द्रविड स्वभावाने देव माणूस कधी कोणाशी वाद करायचा नाही ना कधी भांडण. त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करून भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. राहुल द्रविड यांनी खेळाच्या तिन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय करीअर मध्ये जवळपास 24000 ते 25000 हजाराच्या दरम्यान धावा केल्या आहेत. राहुल द्रविड हे भारतीय एकोणीस वर्षांच्या खालील संघाचे कोच आहेत. राहुल द्रवीड हे यष्टिरक्षक फलंदाज होते. ते कसोटी क्रिकेट मध्ये भारतीय संघाचे महत्वाचे खेळाडू होते त्यांनी कसोटी क्रिकेट मध्ये भारतीय संघासाठी खुप धावा केल्या आहेत. राहुल द्रविड यांच्या बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा. 

अनुक्रमणिका 
1) सुरुवातीचे जीवन 
2) क्रिकेट बद्दल थोडक्यात माहिती.
3) आयपीएल करिअर
4) राहुल द्रविड लव्हस्टोरी
5) मिळालेले पुरस्कार

1) सुरुवातीचे जीवन 
राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी, 1973 मध्ये मध्यप्रदेश मधील इंदूर येथे झाला. त्यांच्या जन्मा नंतर काही दिवसांनी त्यांचे कुटुंब इंदूर वरून बँगलोर ला राहण्यासाठी स्थाईक झाले. त्यांचे जास्तीत जास्त जिवन बँगलोर मध्येच गेले. द्रवीड हे मराठी कुटुंबातून वाढले आहेत. त्यामुळे त्यांची मातृभाषा सुद्धा मराठीच आहे. पण त्याच बरोबर ते मराठी, हिंदी, कन्नड, इंग्लिश भाषा सुद्धा बोलतात. द्रवीड यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील आणि एक लहान भाऊ विजय आहे. त्यांचे वडील शरद द्रवीड जाम बनवणाऱ्या कंपनीत काम करायचे. वडीलांच्या जाम कंपनीत काम करण्यामुळे द्रवीड यांचे नाव ज्यामी असे पडले होते. 

त्यांची आई पुष्पा बँगलोर युनिव्हर्सिटी मध्ये आर्किटे्चर या विषयाची प्रथ्यापक होत्या. त्यांची आई प्राध्यापक असल्या मुळे त्यांच्या घरात शिक्षणाचे महत्व चांगले होते. त्यामुळे द्रवीड सुद्धा शिक्षणावर चांगले लक्ष केंद्रित करायचे. राहुल द्रविड यांनी त्यांचे शिक्षण सेंट जोसेफ बॉईज उच्च शाळेतून घेतल्या नंतर बँगलोर मधीलच सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स विद्यालयातून ब्याच लर चि पदवी घेतली. त्यांनी एम बी ए चे सुद्धा शिक्षण पूर्ण केले आहे. 


2) क्रिकेट बद्दल थोडक्यात माहिती.
द्रवीड यांनी वयाच्या अकरा वर्षा पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वडिलांना क्रिकेट खुप आवडायचे म्हणुन द्रवीड यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांना सुरुवाती पासूनच फलंदाजी करण्याची आवड होती म्हणुन ते आपली सर्व मेहनत फलंदाजीत लावायचे. सुरुवाती पासूनच ते खुप चांगली फलंदाजी करायचे ते खुप कष्टाळू असल्या मुळे त्यांना यश सुद्धा लवकरच मिळू लागले होते. ते कर्नाटक संघा साठी पंधरा वर्षा खालील गटात तसेच एकोणीस वर्षां खालील गटात सुद्धा खेळले. एका समर कॅम्प च्या वेळेला तो क्रिकेट खेळत असताना माजी भारतीय क्रिकेपटू केके तारापूर यांना द्रवीड ची प्रतिभा लक्षात आली.

तो एम बी ए करत असतानाच त्याची भारतीय संघात निवड झाली 1996 च्या निराशा जनक कामगीरी नंतर भारतीय संघातून विनोद कांबळी ला काडुन टाकण्यात आले आणि त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची निवड करण्यात आली. परंतू सुरुवातीच्या 4 सामन्यात द्रवीड यांना फक्त 21 धावा करता आल्या त्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले. हा त्यांचा आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग होता पण त्यांनी खचून न जाता आपल्यातील चुका सुधारल्या अणि क्रिकेट मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यांची देशा अंतर्गण चांगल्या कामगीरी मुळे इंग्लंड ला जाणाऱ्या भारतीय संघात निवड करण्यात आली.

त्याचं कसोटी पदार्पण मात्र स्वप्नवत ठरल ज्या सामन्यात सौरभ गांगुली ने शतकी पदार्पण केलं त्याचं सामन्यात त्यानी तीन उत्तम भागीदारी करून 95 धावांची अतिशय देखणी खेळी केली आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यानंतर त्याने सातत्य पूर्ण कामगीरी करताना आपले संघातील स्थान राखून ठेवले. कसोटी मध्ये संजय मांजरेकर यांच्या जागी त्याची निवड झाली होती. संजय मांजरेकर संघात परत आल्या नंतर सुद्धा द्रवीड यांच्या सर्वोत्कृष्ट कामगीरी मुळे अजय जडेजा ला संघातून कमी करण्यात आले. त्यांच्या दमदार फलंदाजी मुळे अणि त्यांच्या बचावात्मक खेळी मुळे त्यांना द वॉल असे नाव देण्यात आलं.

कसोटी संघात आपल स्थान राखलेला द्रवीड मात्र एकिवसीय सामन्यात मात्र संघर्ष करत होता. धावा काढण्याच्या हळुवार गती मुळे संघात जागा मिळत नव्हती. पण 1999 मध्ये सर्व चित्र बदलले द्रवीड आक्रमक खेळी करू लागला संघाच्या गरजे नुसार धावा जमवू लागला. अणि विकेतकिपिंग सुद्धा करू लागला वर्ल्ड कप सामन्यात विकेट किपींग सह चांगली बॅटिंग करून त्याने आपल नान खणखणीत वाजवून दाखवलं. सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली संघात असल्या मुळे त्याचं योगदान मात्र सारखं दुर्लक्षित होत गेलं. वनडे क्रिकेट मध्ये 210 झेल घेत त्यांनी एक विक्रमच केला आहे.

त्यांची कसोटी क्रिकेट मधील 50 च्या वरची सरासरी त्यांचं कौवशल्या दाखवते. क्रिकेट खेळणाऱ्या जगातील सर्व दहा देशान विरूद्ध शतक ठोकणारा तो जगातील पाहिला फलंदाज ठरला होता. शांत आणि संयमी स्वभाव हे त्याच वैशिष्ट होत. मिस्टर डिफेन्सडेबल या नावाने त्यांची ओळख आहे. राहुल द्रविड यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 164 कसोटी सामने अणि 344 एकिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी 13288 अणि 10889 रन केले आहेत. राहुल द्रविड यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय t20 करिअर मध्ये फक्त एकच t20 सामना 2011 मध्ये इंग्लंड विरूद्ध खेळला. त्यात त्यांनी 31 धावांच योगदान भारतीय संघा साठी दिले होते.

आयपीएल करिअर
राहुल द्रविड आपल्या आयपीएल करिअर मध्ये 2008 ते 2010 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळले. पुठे 2011 ते 2013 मध्ये ते राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळले. आयपीएल मध्ये राहुल द्रविड यांनी एकूण 89 सामने खेळले त्यामधे त्यांनी 2174 धावा केल्या होत्या. त्यामधे त्यांचा बॅटिंग अवरेज 28.23 हा होता.

वर्ष= 2008, टीम- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सामने- 14, धावा- 371, सर्वाधिक धावा- 75, अर्धशतक- 2, शतक- 0, चौकर- 35 षटकात- 11


वर्ष= 2009, टीम- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सामने- 13, धावा- 271, सर्वाधिक धावा- 66, अर्धशतक- 1, शतक- 0, चौकर- 28 षटकात- 3 


वर्ष= 2010, टीम- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सामने- 16, धावा- 256, सर्वाधिक धावा- 52, अर्धशतक- 1, शतक- 0, चौकर- 34 षटकात- 6वर्ष= 2011, टीम- राजस्थान रॉयल्स, सामने- 12, धावा- 343, सर्वाधिक धावा- 66, अर्धशतक- 1, शतक- 0, चौकर- 45 षटकात- 2


वर्ष= 2012, टीम- राजस्थान रॉयल्स, सामने- 16, धावा- 462, सर्वाधिक धावा- 58, अर्धशतक- 2, शतक- 0, चौकर- 63 षटकात- 4


वर्ष= 2013, टीम- राजस्थान रॉयल्स, सामने- 18, धावा- 471, सर्वाधिक धावा- 65, अर्धशतक- 4, शतक- 0, चौकर- 64 षटकात- 5

4) राहुल द्रविड लव्हस्टोरी
त्या मुलीचं नाव होत विजेता पेंठरकर राहणार नागपूरची मराठी कुटुंबात जन्माला आलेली मराठी मुलगी. तिचे वडील ऐर फोर्स मध्ये नोकरीला होते म्हणुन देशभर भिर्तीला असतं. तिचे वडील काही वर्ष बँगलोर मध्ये होते म्हणुन त्यांची द्रवीड च्या कुटुंबाशी ओळख परक्या भाषेच्या राज्यात मराठी बोलणार कुटुंब म्हणुन ते एकत्र आले. त्यामुळे राहुल आणि विजेता एकत्रच खेळायचे त्यांची घट्ट मैत्री झाली. शाळकरी वयातील दोस्ती पेंढारकर यांची बडली झाल्या मुळे तुटली. पण द्रविडने पेंढारकरआंशी सबंध तोडला नव्हता.
ते पत्र फोनवर बोलयचे द्रवीड क्रिकेट खुप चांगल खेळायचा आणि विजेता वडीलांच्या रिटायर मेंट नंतर आपल्या मूळ गावी नागपूरला आली. तिथे मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाली. इकडे दौऱ्याच्या निमित्ताने द्रवीड सारखा नागपूर ला यायचा कधी कधी काही तरी कारण काढून तिकडे जायचा. त्याच्या मित्रांना हे समजले होते याचं काहीतरी नक्की चाललंय. घरच्यांना सुद्धा अंदाज आला होता कुणाचा नकार असण्याचा प्रश्नच नव्हता. राहुल ची चॉईस त्याच्या घरच्यांना सुद्धा पसंद होती. तरीही चहा पोह्याचा कार्यक्रम झाला. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि केलही. आज कित्येक वर्ष झाली तरी द्रवीड कुटुंब टिपिकल मराठी मध्यमवर्गीय आहे.

5) मिळालेले पुरस्कार
राहुल द्रविड यांना त्यांच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक पुरस्कार मिळाले ते खालीलप्रमाणे.

1.1) 1998 मध्ये त्यांना क्रिकेट मधील उत्कृढ कामगीरी मुळे अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

1.2) 1999 मध्ये सीएट टायर कंपनी तर्फे आंतरराष्ट्रीय विश्व करंडक संघाचा खेळाडू

1.3) 2000 मध्ये त्यांच्या चांगल्या कामगिीबद्दल विस्डेन क्रिकेट ऑफ द इअर देण्यात आला.

1.4) 2004 मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री हा देण्यात आला होता.

1.5) 2004 मध्ये त्यांच्या कसोटी क्रिकेट मधील चांगल्या कामगीरी मुळे आयसीसीचा टेस्ट प्लेअर ऑफ द इअर देण्यात आला.

1.6) 2013 मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देण्यात आला.

1.7) 2018 मध्ये हॉल ऑफ फेम देण्यात आला. 

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.
Post a Comment

0 Comments