Ticker

6/recent/ticker-posts

महेंद्र सिंग धोनी जीवनचरित्र (Mahendra Singh dhoni biography in Marathi)


 हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला महेंद्र सिंग धोनी यांच्या जीवनचरित्र (Mahendra Singh dhoni biography in Marathi) बद्दल माहिती देणार आहे ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

महेंद्र सिंग धोनी म्हटल की आपल्या सर्वांचा आवडता माही. आपल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आपल्या आयुष्यात खूप मोठं मोठी रेकॉर्ड बनवली. त्यांची सर्व जगभरात कॅप्टन कूल म्हणून ओळख आहे. महेंद्र सिंग धोनी यांचे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभर त्यांचे भरपूर चाहते आहेत. असाच आपल्या सर्वांचा लाडका माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनी यांच्या बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत. महेंद्र सिंग धोनी हे सर्वात जास्त यश मिळवलेले भरतीत पहिलेच कर्णधार . आहेत. आपल्या भारत देशात सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून आपला माही पहिल्या क्रमांकावर आहे.

पान सिंग हे आपल्या माहीचे  वडील आहेत, ते मेकॉन चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्या जागेवर ते कनिष्ठ पदावर काम करायचे, देवकी देवी हे त्यांच्या आईचे नाव आहे त्या घरकामच करायच्या महेंद्र सिंग धोनी यांना एक मोठा भाऊ आहे त्यांचे नाव नरेंद्र सिंगआहे. त्यांना एक मोठी बहीण आहे. त्यांचे नाव जयंती गुप्ता आहे. त्यांच्या घरच्यांबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा मोठा भाऊ हा सक्रिय राजकारणी आहे. त्यांची राजकारणी बरोबरच एक चांगला माणूस  म्हणून खूप मोठी ओळख आहे. त्यांची मोठी बहीण इंग्रजी शाळेत शिकवण्याचे काम करतात महेंद्र सिंग धोनी यांनी आपले शिक्षण बिहार झारखंड च्या रांची मध्ये शामली येशील जवाहर विद्या मंदिर येथून पूर्ण केले

संपूर्ण नाव= महेंद्र सिंग धोनी

वडिलांचे नाव= पान सिंग 

आईचे नाव= देवकी देवी 

भावाचे नाव= नरेंद्र सिंग 

बहिणीचे नाव= जयंती गुप्ता

पत्नीचे नाव= साक्षी 

मुलीचे नाव= झिवा

फलंदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= उजव्या हाताचा गोलंदाज

अनुक्रमणिका 
१) महेंद्र सिंग धोनी यांचे सुरुवतीचे जीवन
२) महेंद्र सिंग धोनी यांचे आंतरराष्ट्रीय करिअर
३) महेंद्र सिंग धोनी यांचे आयपीएल करिअर
४) मिळालेले पुरस्कार

१) महेंद्र सिंग धोनी यांचे सुरुवतीचे जीवन=
महेंद्र सिंग धोनी यांचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये बिहार मधील झारखंड मध्ये झाला. त्यांचे घर उत्तराखंड च्या अल्मोडा जिल्ह्यात आहे. त्यांच्या गावाचे नाव लवाली आहे लहान महेंद्र सिंग धोनी यांचे मातापिता उत्तराखंड मधून रांचीला राहण्यासाठी स्थाईक झाले तिथे त्यांचे वडील एका कंपनीत ज्युनिअर मॅनेजर चे काम करायचे धोनी यांना एक मोठा भाऊ आहे त्यांचे नाव नरेंद्र सिंग आहे. त्याबरोबरच त्यांना एक मोठी बहीण आहे त्यांचे नाव जयंती गुप्ता आहे. धोनी हे लहानपणा पासूनच अँडम गीलक्रिस्ट, सचिन तेंडुलकर, लता मगेशकरा, आणि अमिताभ बच्चन यांना आपले आदर्श मानायचे.
त्यांनी आपले सुरवातीच्या शिक्षण डी.ए.व्ही विद्या मंदिर शामली येथून पूर्ण केले सुरुवातीपासूनच त्यांचे खेळांकडे जास्त आकर्षण होते. बॅडमिंटन अणि फुटबॉल ते सारखे खेळायचे फुटबॉल मध्ये ते गोल किपर म्हणुन खेळायचे सुरवातीला त्यांना माहीत नव्हते आपण क्रिकेट मध्ये सुद्धा विकेट कीपर महणून खेळणार आहोत त्यांची गोल किपिंग बघून त्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली 
परंतू ते कधीही बॅटिंग करत नव्हते ते फुटबॉल मध्ये गोल किपर असल्युळे क्रिकेट मध्ये फक्त विकेट कीपिंग करायचे.

त्यांनी आपले सुरवातीचे क्रिकेटचे प्रशिक्षण द कमांडो क्रिकेट अकॅडमी मधून 1995 ते 1998 पर्यंत तब्बल तीन वर्षे त्यांनी तिथेच प्रशिक्षण घेतले. ते प्रशिक्षण घेत असताना त्यांनी इतके चांगले प्रदर्शन केले की त्यांची निवड विनू मानकंड ट्रॉफी 16 वर्षा खालील गटात करण्यात आली आणि तिथे त्यांनी खूप चांगले प्रदर्शन केले. परंतू त्यांचे शिक्षण फक्त 10 वी झाले होते . आणि त्यांनी रेल्वे तिकीट मास्तर ची परीक्षा दिली अणि ते त्यात उतिर्न झाले. तिकीट मास्तर म्हणुन त्यांची निवड करण्यात आली.

वर्ष 2001 ते 2003 पर्यंत ते साऊथ वेस्ट रेल्वे मिदनापूर मध्ये एक ईमानदार रेल्वे कर्मचारी म्हणून काम करायचे त्यांचे मित्र त्यांची आठवण काढतात तेव्हा म्हणायचे धोनी हा खूप प्रेमळ आणि ईमानदार माणूस होता पुढे त्यांचे मित्र त्यांच्या बद्दल सांगतात म्हणतात धोनी हा खूप खोडसर स्वभावाचा होता ते जेव्हा रिल्वे कॉलनीत राहायचे तेव्हा ते खूप मस्ती करायचे. एकदा तर त्यांनी भुताचा वेश धारण करून सर्वच लोकांना घाबरवले होते. 

धोनी बिहार च्या एकोणीस वर्षा खालील टीम मध्ये सुद्धा खेळले आणि त्यांनी खूप चांगले कामगीरी केली ते झारखंड टीम मधुन सुद्धा अनेक वेळा खेळायचे. धोनीची आणखी एक गोष्ट म्हणजे धोनी ज्या टीम कडून खेळायचे ज्या दिवशी त्यांची ब्याट चालायची त्या दिवशी समोरच्या टीम ची खैर नसायची. तर धोनी यांची निवड भारतीय संघात कशी झाली. बीसीसीय ची अशी एक  संस्था आहे जी खेड्या पाड्यातील क्रिकेट चे हुनर असलेल्या मुलांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळवून देतात. त्या वेळेस अकाश पोतदार जे 1960 मध्ये बंगाल टीम चे कॅप्टन होते त्यांची नजर धोनीवर पडली
अणि माहीला संधी मिळाली

२) महेंद्र सिंग धोनी यांचे आंतरराष्ट्रीय करिअर =
महेंद्र सिंग धोनी यांच्या आंतरराष्ट्रीय करिअर ला सुरुवात झाली 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध. महेंद्र सिंग धोनी आपल्या पहिल्याच सामन्यात रन आऊट झाले. बांगलादेश सिरीज मध्ये त्यांना काही खास कामगीरी करता आली नाही. पण नशिबाने त्यांना साथ दिली आणि पुन्हा एकदा त्यांची पाकिस्तान दौऱ्यावर निवड करण्यात आली. अणि तिथे मात्र माहीने संधीच सोन करत पाकिस्तान विरुद्ध विशाखापट्टणम च्या मैदानावर एक नवा इतिहास रचत 123 चेंडूत नाबाद 148 धावा काढण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगीरी करणारे ते पाहिले भारतीय विकेट किपर फलंदाज बनले.

श्रीलंकेविरुद्ध कोणताही भारतीय फलंदाज टिकत नव्हता भारताला जिंकण्यासाठी 299 धावांचा डोंगर उभा करायचा होता मग फलंदाजी साठी आलेल्या धोनीने 185 चेंडूत 183 काढत भारताला विजय मिळवून दिला आणि आपली संघातील जागा निश्चित केली. तेंव्हा भारताने श्रीलंकेला 3-0 ने पराभूत करून मालिका जिंकली त्यात धोनी यांना मेन ऑफ द सिरीज चा किताब मिळाला होता.

डिसेंबर 2005 मध्ये धोनी यांनी कसोटी मध्ये पदार्पण केले. सप्टेंबर 2007 मध्ये धोनी यांना भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार बनण्याची संधी मिळाली. त्यांनी राहुल द्रविड यांच्या कडून भरतीत वनडे टीमची कर्णधार पदाची जबाबदारी स्वता वर घेतली. धोनी यांनी एका सामन्यामध्ये सर्वात जास्त स्टंपिंग करत एडम गिलक्रिस्ट यांच्या आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड ची बराबरी केली. 

धोनी दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या पहिल्याच t20 विश्व चषकात भारताचे कर्णधार बनले. भरताने फायनल सामन्यात पाकिस्तानला हरवले. त्या सामन्यात धोनी यांनी फायनल ओव्हर जोगिंदर शर्मा सारख्या अनुभवी गोलंदाजाला टाकायला लावली आणि ती ओव्हर जोगिंदर शर्मा आणि धोनी यांच्या साठी मास्टरस्ट्रोक ठरली. ऑगस्ट 2008 मध्ये धोनी यांनी श्रीलंकेत भारताला पहिली द्विपक्षीय सिरीज जिंकून दिला.

ऑगस्ट 2008 मध्ये महेंद्र सिंग धोनी हे भारतीय कसोटी संघाचे कर्णधार बनले नागपूर मध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथा सामन्यात त्यांनी अनिल कुंबले यांच्याकडून कर्णधार पद घेतले. महेंद्र सिंग धोनी हे आयसीसी च्या क्रमवारीत सर्वश्रेष्ठ वनडे खेळाडू बनले होते.

मार्च 2009 मध्ये धोनी यांच्या कॅप्टनसी मध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाने न्यूझीलेंड मध्ये द्विपक्षीय एकदिवसीय सिरीज आपल्या नावावर केली. एप्रिल 2011 मध्ये धोनी यांनी श्रीलंकेच्या विरोधात वर्ल्ड कप फायनल मॅच मध्ये 79 चेंडूत 91 धावा नाबाद केल्या त्या वेळेस भारत अठ्ठावीस वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन बनाल होता. षटकार मारून मॅच जिंकवणाऱ्या धोनी यांना मेन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. फेब्रुवारी 2013 मध्ये धोनीने आपल्या कसोटी कारकीर्दीतले पहिले दुहेरी शतक झळकावले. धोनी 49 टेस्ट सामन्यांत 21 वेळा संघाला जिंकून देत सैरभ गांगुली यांचे रेकॉर्ड तोडत टेस्ट क्रिकेट मधिल सर्वात यशस्वी कॅप्टन बनले.
 
3) महेंद्र सिंग धोनी यांचे आयपीएल करिअर
आता आयपीएल म्हटल की आपल्या सर्वांचा आवडीचा विषय आयपीएल बघत नाही असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही. आयपीएल म्हटल की हि तुझी टीम ती माझी टीम आणि रोज मित्रा मित्रांची भांडणे. सर्वात जास्त चाहते आहेत चेनई सुपर किंग या टीम चे अणि त्याच टीमचा कॅप्टन आपल्या सर्वांचा लाडका माही. 2008 पासून माही हा चेनई सुपर किंग या आयपीएल मधील संघाचा कर्णधार आहे. आयपीएल मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून माहीची ओळख आहे. त्यांची कॅप्टन कूल म्हणून सुद्धा जगभर ओळख आहे. महेंद्र सिंग धोनी यांनी चेन्नई सुपर किंग या संघाला अनेक वेला चॅम्पियन बनवले.

आयपीएल 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना महेंद्र सिंग धोनी यांनी 16 सामन्यांत, मध्ये 414 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी 2 अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 65 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2009 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 14 सामन्यांत,332 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 58 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

 आयपीएल 2010 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 13 सामन्यांत, 287 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 66 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2011 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 16 सामन्यांत, 392 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 70 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2012 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 19 सामन्यांत, 358 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी एक अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 51 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.


आयपीएल 2013 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 18 सामन्यांत, 461 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी चार अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 67 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2014 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 16 सामन्यांत, 371 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी एक अर्धशतकी खेळी केली होती. 57 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2015 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 17 सामन्यांत, 372 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी एक अर्धशतकी खेळी केली होती. 53 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2016 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 14 सामन्यांत, 484 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी एक अर्धशतकी खेळी केली होती. 64 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2017 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 16 सामन्यांत, 290 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी एक अर्धशतकी खेळी केली होती. 61 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2018 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 16 सामन्यांत, 455 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 79 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

आयपीएल 2019 मध्ये पुन्हा एकदाचेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना धोनी यांनी 15 सामन्यांत, 416 धावा काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 84 हि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

४) मिळालेले पुरस्कार
महेंद्र सिंग धोनी यांना त्यांच्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले 2007 मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला, 2018  मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

महेंद्र सिंग धोनी यांनी 15 ऑगस्ट 2020 ला क्रिकेटला अखेरचा रामराम केला त्यांनी निवृत्ती घेतली.

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments