Ticker

6/recent/ticker-posts

कपिल देव जीवनचरित्र ( kapil dev biography in Marathi)


कपिल देव यांचे जीवचरित्र ( kapil dev biography in Marathi) बद्दल माहिती देणार आहे ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

कपिल देव हे एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणुन जगभर प्रसिद्ध आहे. कपिल देव यांना ओळखत नाही असा एकही माणूस आपल्या भारतामध्ये सापडणार नाही. कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मध्ये भारतीय संघाला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. कपिल देव यांची एक उत्कृष्ठ फलंदाजा बरोबरच एक चांगला गोलंदाज म्हणुन सुद्धा जगभर ओळख होती. भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्यांचा नंबर लागतो. कपिल देव यांच्या सारखा क्रिकेट बद्दल प्रेम, आपुलकी, दूरदृष्टी, खेळ भावना जपणारा खेळाडू पुन्हा होने नाही. कपिल देव हे भारतीय संघाचे कर्णधार होते त्यांनी 1983 च्या क्रिकेट विश्चषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. कपिल देव यांची आणखी एक ओळख म्हणजे ते खूप शांत आणि संयमी स्वभावाचे होते. कपिल देव यांच्या बद्दल थोडक्यात माहिती खालीप्रमाणे.

पूर्ण नाव= कपिल देव रामलाल नीखंज

जन्म= 7 जानेवारी 1959

जन्म ठिकाण= चंदिगढ

वडिलांचे नाव= रामलाल निखंज

आईचे नाव= राज कुमारी लाजवंती

पत्नीचे नाव= रोमी भाटिया

भावांचे नाव= रमेश आणि भूषण

मुलीचे नाव= अमिया देव

अनुक्रमणिका=

1) कपिल देव यांचे सुरुवातीचे जीवन 

2) कपिल देव यांचे आंतरराष्ट्रीय करिअर

3) विश्व चषक 1983 ची पूर्ण माहिती

4) मिळालेले पुरस्कार अणि कर्तुत्व

5) कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

1) कपिल देव यांचे सुरुवातीचे जीवन 

कपिल देव यांचा जन्म 7 जानेवारी 1959 मध्ये पंजाब मधील चंदिगढ या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल निखंज होते तर त्यांच्या आईचे नांव राजकुमारी हे होते कपिल देव यांना दोन भावंडे होती एकाचे नाव रमेश आणि दुसऱ्या भावाचे नाव भूषण होते. कपिल देव यांच्या पत्नीचे नाव रोमी भाटिया हे होते परंतू भारत पाकिस्तान वेगळे होण्याच्या अगोदर  कपिल देव यांचे आईवडील पाकिस्तान मध्ये राहत होते. परत भारत पाकिस्तान वेगळे झाल्यावर ते भारतात राहायला आले. कपिल देव आणि त्यांच्या दोन भावांचा जन्म भारतातच झाला. पण त्यांच्या चार बहिणींचा जन्म पाकिस्तान मध्येच झाला होता.

कपिल देव यांना लहनपणापासूनच खेळांची खूप आवड होती आणि त्यामध्ये क्रिकेट हा खेळ त्यांना सर्वात जास्त आवडायचा ते क्रिकेटवर खूप प्रेम करायचे. त्यांनी आपले शिक्षण डी. ए. व्हि प्राथमिक शाळेतून घेतले होते त्या शाळेत असताना सुद्धा ते स्पोर्ट्स मध्ये खुप चांगले होते. सुरवातीच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सेन टाय वर्ड शाळेत शिकायला गेले तिथे सुद्धा  त्यांनी क्रिकेट खेळामध्ये खुप चांगला कामगीरी करून दाखवली क्रिकेट या खेळाबद्दल कपिल देव यांचे प्रेम आपुलकी बघून त्यांच्या घरच्यांनी त्यांना क्रिकेट शिकण्यासाठी बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. 

तस बघितलं तर कपिल देव आधीपासूनच खुप ट्यालेंटेड होते पण थोड्या काही त्यांना प्रशिक्षणाची गरज होती ते शिक्षण त्यांना पूर्व क्रिकेटर देश प्रेम आझाद यांनी दिले. पण कपिल देव यांना माहीत होत एक वेगवान गोलंदाज होण्यासाठी आपला खांदा मजबूत असणे खुप गरजेचे आहे. म्हणुन ते लाकड कापण्याचे काम करायचे. लवकरच त्यांच्या उत्कृष्ठ गोलंदाजीला बघून त्यांना नोव्हेंबर 1975 मध्ये हरियाणाच्या रणजी क्रिकेट टीम मध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली. अणि आपल्या या पहिल्याच सामन्यात सहा विकेट घेऊन क्रिकेट जगतात एक नवीन सितारा येतोय हे ओरडून सांगितले. त्या सिझन मध्ये त्यांनी 30 सामन्यात 121 विकेट घेतल्या.

त्यांच्या या अद्भूत खेळाल बघून त्यानं इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, विल्स ट्रॉफी मध्ये खेळण्याची संधी मिळाली. अणि डोमेस्टिक लेवल वर त्यांच्या खेळायचे प्रदर्शन बघून त्यांना अनेक टुर्नामेंट मध्ये खेळण्याची संधी मिळाली.

 2) कपिल देव यांचे आंतरराष्ट्रीय करिअर

कपिल देव यांच्या आंतरराष्ट्रीय करिअर ची सुरुवात 16 ऑक्टोंबर 1978 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्याने झाली. परंतू दुःखद गोष्ट ही की भारत ही सिरीज हारला पण या सिरीज मधून भारतीय संघाला एक उत्कृष्ठ गोलंदाज आणि खुप फटके बाजी करणारा कपिल देव यांच्या सारखा फलंदाज मिळाला अणि नंतर पुढे जाऊन काही दिवसांनी वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली त्यात त्यांनी अपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

परंतू शतक कोणीही मारू शकते पण त्या वेळेस वेस्ट इंडिज संघाची गोलंदाजी सगळ्यात खतरनाक मानली जायची. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या 25 सामन्यात 100 विकेट आणि 1000 धावा पूर्ण करणारे कपिल देव हे पहिले भारतीय अष्टपैलू खेळाडू होते. अणि तेंव्हा पासून भारतीय संघाला एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू मिळाला होता. त्यांच्या चांगल्या खेळाच्या जोरावर 1982 मध्ये त्यांना श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

परंतू ही संधी त्यांना त्या वेळेचे कर्णधार सुनिल गावसकर यांना विश्रांती दिल्या मुले मिळाली होती. पण नंतर लवकरच ते भारतीय संघाचे कायमचे कर्णधार बनले. त्यांच्या समोर कर्णधार पदाची सर्वात मोठे आव्हान 1983 विश्व चषक मध्ये भारताला खेळायचे होते. त्या वेळेस भारतीय संघ जिंकेल असे कोणालाही वाटत न्हवते पण भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज विरुद्ध फायनल सामना जिंकून विश्व चषकावर आपले नाव कोरले त्या विश्व चषकात भारतीय कर्णधार कपिल देव यांनी 303 धावा अणि 12 विकेट्स घेतल्या, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण करुन 7 झेल पकडले. खूप सामने भारतीय संघाला जिंकून दिले 

विश्व चशकानंतर त्यांना काही मोजक्या खेळाडूंमध्ये जे स्वतःच्या जीवावर कोणताही सामना जिंकून देवू शकतात पुढे जाऊन त्यांनी भारतीय संघाला खुप सिरीज सामने जिंकून दिले. आणि स्वतःला जगातील सर्वांत मोठ्या खेळाडूंच्या यादीत नेहून ठेवले.

 3) विश्व चषक 1983 ची पूर्ण माहिती 

उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला झिम्बाब्वे ला पराभूत करणे गरजेचे होते. अणि या सामन्यात कपिल देव यांनी 175 धावांची खेळी केली. त्यांनी या धावा फक्त 138 चेंडूत केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी 22 चौकार आणि 12 षटकार ठोकले होते. तो सामना भारताने जिंकला.

विश्व चषक 1983 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कपिल देव यांच्या कडे होते. 25 जून 1983 मध्ये लॉर्ड च्या मैदानाच्या मधोमध कपिल देव निखंज आणि मदनलाल यांच्यात बोलणे झाले त्याचा प्रभाव विश्व चषक फायनल वर नाही तर त्याने कायमचे भारतीय संघाचा चेहराच बदलला. व्ही. व्ही. एन. रिचर्ड्स ताबडतोड फलंदाजी करत त्याने मदनलाल याला लागोपाठ 4 चौकार लगावले कर्णधार कपिल देव विचार करत होते षटक दुसऱ्याला देण्याचं ठरवलं पण मदनलाल यांनी एक आणखी ओव्हर त्यांना देण्याची विनंति केली.

अणि दुसऱ्याच ओव्हर मध्ये त्याला कर्णधार कपिल यांच्या कडे कॅच देत बाद केले. लॉर्ड च्या मैदानावर तो दिवस उजाडला भारत आणि वेस्ट इंडिज फायनल सामना भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगला सुरुवात झाली नाही. वेस्ट इंडिज गोलंदाज रोवर्ट्स ने 2 धावांवर सुनिल गावसकर यांना बाद केले त्या सामन्यात भारतीय फलंदाज श्रीकांत चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याने एक बाजु सांभाळून ठेवली होती ते बाद झाल्या नंतर मोइंदर आणि यश पाल यांनी भारतीय संघाला 30 धावांची भागीदारी करून दिली. भारतीय संघ वेस्ट इंडिज च्या भेदक माऱ्या समोर कशी तरी 183 धावा करू शकली. वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू इतके आनंदी झाले की जणू त्यांनी विश्व चषक जिंकला. पण तो आनंद काही फार वेळ टिकला नाही भारतीय गोलंदाजी समोर वेस्ट इंडिज चे फलंदाज खास कामगीरी करू शकले नाहीत. त्यांना 183 ही धाव संख्या गाठता आली नाही आणि भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला विश्व चषक आपल्या नावावर केला.

२) मिळालेले पुरस्कार अणि कर्तुत्व 

1.1= 1970- 1980 मध्ये त्यांना चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

1.2= 1982 मध्ये त्यांना पद्ममश्री पुरस्कार देण्यात आला.

1.3= 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.

1.4= 1994 मध्ये त्यांनी रिचर्ड हेडलीचा सर्वाधिक विकेट्स चा विक्रम मोडला. 

1.5= 2001 मध्ये त्यांना विस्डेन इंडियन क्रिकेटर  ऑफ सेंचरी हा मान देण्यात आला.

1.6= 2008 मध्ये त्यांना भारतीय लष्कराद्वारे लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आले.

1.7= 2010 मध्ये त्यांना आयसीसी चा क्रिकेट हॉल ऑफ फेम हा पुरस्कार मिळाला.

5) कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

कपिल देव यांनी केवळ क्रिकेटच नव्हे तर सिनेमातही आपले योगदान दिले आहे. आर्यन अंब्रेकेबल, चेन कुली की मेंकुलि, मुजसे शादी करोगी या सिनेमा द्वारे ते झळकले आहेत. कपिल देव यांच्या जीवनावर 83 हा सिनेमा आला आहे.

कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेट ला अखेरचा रामराम केला त्यांनी निवृत्ती घेतली.

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.Post a Comment

0 Comments