Ticker

6/recent/ticker-posts

गौतम गंभीर जीवनचरित्र ( Gautam Gambhir biography)


 गौतम गंभीर यांच्या जीवनचरित्र ( Gautam Gambhir biography) बद्दल माहिती देणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

क्रिकेट ने आपल्याला खूप मोठ मोठे मॅच विनर खेळाडू दिले आहेत त्यातीलच एक म्हणजे आपल्या भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज आपल्या सर्वांचा लाडका गौतम गंभीर. त्यांनी भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. गौतम गंभीर हे सचिन तेंडुलकर यांच्या बरोबर सलामीला यायचे सलामीवीर म्हणुन त्यांनी भारतीय संघा साठी भरपूर धावा केल्या आहेत. त्यांनी भारतीय संघाला दोन विश्व चषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. भारतीय संघ कितीही संकटात असला तरी गंभीर तारणहार बनून यायचा आणि सामना जिंकून द्यायचा. गौतम गंभीर यांनी आपल्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आणि ते तोडलेही. त्यांचे नाव जगातील महान खेळाडूंमध्ये आदराने घेतले जाते. हाच तो भारतीय संघाचा मॅच विनर खेळाडू गौतम गंभीर यांच्या जीवनचरित्र बद्दल आपल्या लेखात महिती बघणार आहोत ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा. 

पूर्ण नाव= गौतम गंभीर

वडिलांचे नाव= दीपक गंभीर

आईचे नाव= सीमा गंभीर

पत्नीचे नाव= नताशा गंभीर

फलंदाजीची शैली= डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली= डाव्या हाताचा गोलंदाज

 अनुक्रमणिका

1) जन्म आणि शिक्षण

2) क्रिकेटची सुरुवात

3) आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये पदार्पण आणि करिअर

4) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण आणि करिअर
       
5) आंतरराष्ट्रीय t20 क्रिकेट मध्ये पदार्पण आणि करिअर

6) आयपीएल करिअर (indian premier league) 

7) मिळालेली पुरस्कार

जन्म आणि शिक्षण

गौतम गंभीर यांचा जन्म 14 ऑक्टोंबर, 1981 मध्ये भारताची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये झाला. गौतम गंभीर क्रिकेट बरोबरच शिक्षणावर सुद्धा खूप लक्ष द्यायचे त्यांनी आपले शिक्षण दिल्ली मधील हिंदू कॉलेज मधून घेतले. आणि पुढे जाऊन दिल्ली युनिव्हर्सिटी मधून आपले पदवीचे शिक्षण घेतले. 

क्रिकेटची सुरुवात 

गौतम गंभीर यांना लहान पना पासुनच क्रिकेट खेळण्याची खुप अवड होती. त्यांनी आपल्या वयाच्या दहाव्या वर्ष पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेंव्हा ते त्यांचे मामा पवण कुल्हाती यांच्या बरोबर राहायचे अभ्यासातून वेळ मिळाल्यावर क्रिकेटची प्रॅक्टीस करायचे. त्यांचे मामाच त्यांना क्रिकेट शिकवायचे ते त्यांच्या मामालाच आपला गुरु मानतात कारण त्यांच्या मामांनी चांगल्या आणि वाईट प्रसंग मध्ये त्यांची साथ दिली. आपल्या भाच्याचे क्रिकेटच्या प्रती प्रेम बघून क्रिकेट मध्येच करिअर करायला सांगितले. गौतम यांना क्रिकेट मधील प्रोफेशनल ट्रेनिंग देण्यासाठी दिल्ली मधील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी मध्ये घेऊन गेले. 

तिथे त्यांचे कोच होते संजय भरतावज आणि राजु टंडन तिथे गंभीर यांनी कोच संजय भरतवाज यांच्या नेतृत्वाखाली आपल्या क्रिकेट खेळात आणखी सुधारणा केली. त्याचं वेळेस त्यांनी आपले शिक्षण सुद्धा पूर्ण केले. त्याच्या नंतर तब्बल एका वर्षा नंतर त्यांची निवड वर्ष 2000 मध्ये बँगलोर च्या नॅशनल क्रिकेट अकादमी मध्ये झाली. गौतम क्रिकेट बरोबरच आपल्या अभ्यासावर सुद्धा खूप लक्ष द्यायचे. पुढे त्यांची निवड दिल्ली च्या रणजी संघात झाली. त्यात त्यांनी खुप चांगली कामगीरी करून दाखवली. नंतर डोमेस्टिक क्रिकेट मध्ये सुद्धा त्यांनी खुप चांगले प्रदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये पदार्पण आणि करिअर

गौतम गंभीर यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट मधील उत्तम कामगिरी मुळे, 11 एप्रिल, 2003 मध्ये बांगलादेश विरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्या सिरीज मधील तिसऱ्या सामन्यात गौतम गंभीर यांनी 71 धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्यात ते मेन ऑफ द मॅच बनले होते. 2005 मध्ये त्यांनी श्रीलंकेवरुद्धच्या सामन्यात 97 चेंडूत 103 धावा चोपत आंतरराष्ट्रीय एकदवसीय सामन्यात आपले पहिले शतक केले. 2005 ते 2007 पर्यंत ते फक्त एकिवसीय सामने खेळले आणि भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. तरीही त्यांचे 2007 मध्ये होणाऱ्या एकिवसीय विश्व चषक मध्ये त्यांची निवड झाली नाही. तेंव्हा पासून त्यांना क्रिकेट खेळू वाटत नव्हते. हा त्यांच्या जीवनातील सर्वात वाईट प्रसंग होता. 

त्याच्या नंतर काही महिन्यांनी बांगलादेश ला जाणाऱ्या भारतीय संघात निवड करण्यात आली. हया सिरीज मध्ये त्यांनी चांगले प्रदर्शन करत आपले स्थान संघात पुन्हा मिळवले. 2010 मध्ये त्यांना महेंद्र सिंग धोनी यांच्या अनुपस्थित न्यूझीलडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या सिरीज मध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हि सिरीज 5-0 ने जिंकली त्यात गौतम गंभीर मेन ऑफ द सिरीज बनले. 2011 मध्ये होणाऱ्या एकिवसीय विश्व चषक मध्ये त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर जे घडले तो एक इतिहासच होता. विश्व चषक फायनल सामन्यात सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग लवकर आऊट झाल्या नंतर 121 चेंडूत 97 धावा करून 28 वर्षा नंतर भारतीय संघाला विश्व चषक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. 

ह्या विश्व चषक सामन्यात त्यांनी चार अर्धशतकाच्या मदतीने 393 धावा काढल्या होत्या. त्यांनी आपल्या एकिवसीय क्रिकेट करिअर मध्ये 147 एकिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकांबरोबर 34 अर्धशतकांचा समावेश होता.  

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण आणि करिअर 

त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअर ची सुरुवात 3 नोव्हेंबर, 2004 मध्ये बॉर्डर गावासकर ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध शेवटच्या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले. आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात साऊथ आफ्रिका सारख्या मजबूत संघाच्या विरोधात 96 धावांची खेळी करून आपले योगदान दिले. त्याचं वर्षी डिसेंबर 2004 मध्ये त्यांनी बांगलादेश विरुद्ध सामन्यात पहिले कसोटी शतक सुद्धा केले. त्यानंतर 2005 मध्ये ते श्रीलंेविरुद्धच्या सिरीज मध्ये चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. त्यांना कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यांनी 2008 मध्ये पुन्हा कसोटी क्रिकेट संघामधये स्थान मिळवले. 

न्यूझलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 137 धावांची सामना बाचावू खेळी केली. ते बघून जगातील आक्रमक फलंदाजातील एक वीरेंद्र सेहवाग यांनी राहुल द्रविड यांच्या नंतर द वॉल हे नाव त्यांना दिले. त्याच सामन्यात गौतम गंभीर यांनी 430 पेक्षा जास्त चेंडू खेळून साऊथ आफ्रिका गोलंदाजना पार थकवले. 2009 मध्ये आयसीसी च्या टेस्ट क्रमवारीत ते प्रथम क्रमांकावर होते. गौतम गंभीर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअर मध्ये 58 सामने खेळले त्यात त्यांनी 41.55 च्या सरासरीने 4154 धावा काढल्या होत्या. त्यात 9 शतकांबारोबर 22 अर्धशतकानचा समवेश होता.

आंतरराष्ट्रीय t20 क्रिकेट मध्ये पदार्पण आणि करिअर  

त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय t20 करिअर ची सुरुवात 2007 मध्ये t20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळून केली. भारत अडचणीत असताना फायनल सामन्यात गौतम गंभीर यांनी खेळलेली  54 चेंडूत, 75 धावांची अविस्मरणीय खेळी करून भारताला पहिला t20 विश्व चषक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्या विश्व चषक मध्ये त्यांनी तीन अर्धशतकी खेळी करून 227 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या म्यातू हेडन नंतर सर्वाधिक धावा करणारे दुसरे खेळाडू बनले.

त्यांनी आपल्या t20 करिअर मध्ये 37 सामने खेळले होते. त्यात त्यांनी 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या होत्या. त्यात सात अर्धशतकांचा समावेश होता.

आयपीएल करिअर (indian premier league) 

गौतम गंभीर यांनी आपल्या आयपीएल करिअर मध्ये रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या सारखी उत्तम कामगिरी केली होती. गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा आयपीएल चा किताब जिंकला. त्यांनी 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग संघाला हरवून गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. 2014 मध्ये किंग जी एलेवन पंजाब संघाला हरवून दुसरा किताब जिंकला.आयपीएल मध्ये गौतम गंभीर यांची कामगिरी खालीलप्रमाणे

वर्ष= 2008, संघ- दिल्ली डेडेवल्स, सामने-14, धावा- 534, सर्वाधिक- 86, शतके- 0, अर्धशतके- 5, चौकार- 68, षटकार- 8

वर्ष= 2009, संघ- दिल्ली डेडेवल्स, सामने-15, धावा- 286, सर्वाधिक- 71, शतके- 0, अर्धशतके- 1, चौकार- 32, षटकार- 4

वर्ष= 2010, संघ- दिल्ली डेडेवल्स, सामने-11, धावा- 277, सर्वाधिक- 72, शतके- 0, अर्धशतके- 2, चौकार- 32, षटकार- 6

वर्ष= 2011, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-15, धावा- 378, सर्वाधिक- 75, शतके- 0, अर्धशतके- 2, चौकार- 44, षटकार- 3

वर्ष= 2012, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-17, धावा- 590, सर्वाधिक- 93, शतके- 0, अर्धशतके- 6, चौकार- 64, षटकार- 17

वर्ष= 2013, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-16, धावा- 406, सर्वाधिक- 60, शतके- 0, अर्धशतके- 4, चौकार- 51, षटकार- 5

वर्ष= 2014, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-16, धावा- 335, सर्वाधिक- 69, शतके- 0, अर्धशतके- 3, चौकार- 36, षटकार- 4

वर्ष= 2015, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-13, धावा- 327, सर्वाधिक- 60, शतके- 0, अर्धशतके- 3, चौकार- 41, षटकार- 4

वर्ष= 2016, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-15, धावा- 501, सर्वाधिक- 90, शतके- 0, अर्धशतके- 5, चौकार- 54, षटकार- 6

वर्ष= 2017, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-16, धावा- 498, सर्वाधिक- 76, शतके- 0, अर्धशतके- 4, चौकार- 61, षटकार- 7

वर्ष= 2018, संघ- कोलकत्ता नाईट रायडर्स, सामने-6, धावा- 85, सर्वाधिक- 55, शतके- 0, अर्धशतके- 1, चौकार- 8, षटकार- 1

संपुर्ण आयपीएल करिअर= सामने- 154, धावा- 4217, शतके-0, अर्धशतके- 36, चौकार- 491, षटकार- 59

मिळालेली पुरस्कार

2009 मध्ये आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द सिझन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

2009 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.

2019 मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

गौतम गंभीर यांनी 3 डिसेंबर, 2018 मध्ये क्रिकेटला अखेरचा रामराम केला त्यांनी निवृत्ती घेतली.

मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments