Ticker

6/recent/ticker-posts

अनिल कुंबळे यांचे जीवचरित्र ( anil Kumble biography in Marathi)


 अनिल कुंबळे यांचे जीवचरित्र ( anil Kumble biography in Marathi) बद्दल माहिती देणार आहे ती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

अनिल कुंबळे हे पूर्व भारतीय स्पिन गोलंदाज आहेत. अनिल कुंबळे हे भारतीय संघाचे कर्णधार सुद्धा होते अनिल कुंबळे यांना ओळखत नाही असा एकही माणूस आपल्या भारतामध्ये सापडणार नाही. भारतातच नव्हे तर जगभरात सापडणार नाही. अनिल कुंबळे यांचे भरपूर चाहते आहेत. अनिल कुंबळे यांनी आपल्या फिरकी गोलंदाजी च्या जोरावर भरतीत संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. अनिल कुंबळे हे कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेत घेणारे पहिले भारतीय फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी आपल्या करकिर्तीत अनेक फलंदाजांच्या दांड्या उडवल्या आहेत. त्यांनी कर्नाटक संघाकडून हैद्राबाद विरुद्ध 1989 मध्ये आपला फस्ट क्लास डेब्यू केला होता. त्या सामन्यात अनिल कुंबळे यांनी चार विकेट फटकवल्या होत्या. त्यांचा उत्कृष्ठ खेळ बघून त्यांना पाकिस्तान विरुद्ध एकोणीस वर्षांच्या खालील गटात सामील करून घेण्यात आले होते. अशाच या आपल्या आवडत्या अनिल कुंबळे याच्या जीवनचरित्र विषयी आपल्या लेखात आपण माहिती बघणार आहोत. 

नाव= अनिल कुंबळे 

जन्म= 10 ऑक्टोंबर 1970

जन्म ठिकाण= बंगलोर भारत

वडिलांचे नाव= कृष्ण स्वामी 

आईचे नाव= सरोजा

पत्नीचे नाव= चेतना रामतीर्थ 

फलंदाजीची शैली= उजव्या हाताचा फलंदाज 

गोलंदाजीची शैली=  उजव्या हाताचा गोलंदाज ( लेगस्पिनर)

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण= , विरूद्ध- इंग्लंड, तारीख- 9 ऑगस्ट ते 14  ऑगस्ट 1990 मध्ये

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण= विरुद्ध - श्रीलंका, तारीख - 25 एप्रिल, 1990 मध्ये 

आंतरराष्ट्रीय कसोटी करियर= सामने- 132, धावा- 2506, बळी- 619, सर्वोत्तम कामगिरी- 10/74 

आंतरराष्ट्रीय वनडे करियर= सामने- 271, धावा- 938, बळी- 337 सर्वोत्तम कामगिरी- 6/12

आयपीएल करियर= सामने- 42, विकेट- 45, 
 
मिळालेले पुरस्कार= 1995 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2005 मध्ये भारत सरकारचा नागरी पुरस्कार पद्मश्री, 2015 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम क्रिकेट पुरस्कार मिळाले.

1) संपुर्ण माहिती
अनिल कुंबळे यांचा जन्म 10 ऑक्टोंबर 1970 मध्ये भारतातील बंगलोर या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण स्वामी आणि आईचे नाव सरोज हे होते. तर त्यांच्या पत्नीचे नाव चेतना रामतीर्थ होते. अनिल कुंबळे आणि चेतना कुंबळे यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव मयास आहे तर मुलीचे नाव स्वास्ती हे आहे अनिल कुंबळे यांचे प्राथमिक शिक्षण होनी सेंट इंग्लिश स्कूल मधून घेतले. त्यांनी 1992 साली राष्ट्रीय विद्यालय ऑफ इंजनिअरिंग कॉलेज मधून मकेनिकल बी. ई चे शिक्षण घेतले. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी यंग क्रिकेटर क्रिकेट अकादमी ला जॉईन झाले होते. परंतू त्या वेळेस कुणालाही माहीत नव्हते पूठे जाऊन तो भारताचा महान गोलंदाज होणार आहे. 

त्यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षां पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुढे खुप लवकरच त्यांना वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली त्यांना 25 एप्रिल 1990 मध्ये  श्रीलंके विरूद्ध पहिला खेळला. 9 ऑगस्ट 1990 मध्ये त्यांनी इंग्लंड विरूद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्याच्या आगोदर अनिल कुंबळे यांनी 30 नोव्हेंबर 1989 मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. आपल्या कसोटी पदार्पण नंतर अनिल कुंबळे यांनी 1992 पर्यन्त एकही कसोटी सामना खेळला नाही.

त्याच्या नंतर पुढे जाऊन त्यांनी इराणी ट्रॉफी मध्ये 138 धावा देत 13 बळी घेतले. तेंव्हा त्यांना साऊथ आफ्रिका आणि झिंबाब्वे विरूद्ध सिरीज मध्ये सामील करून घेतले साऊथ आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी 8 बळी घेतले. अणि कसोटी क्रिकेट मध्ये आपल्या गोलंदाजीची मोहर उमटवली. चार सामन्यांच्या सिरीज मध्ये त्यांनी एकूण अठरा बळी मिळवले याच्या पुढे आता अनिल कुंबळे थांबणार नव्हते. इंग्लंड जेव्हा भारतीय दौऱ्यावर आली होती त्यांच्या विरूद्ध अनिल कुंबळे यांनी 3 सामन्यात एकवीस बळी घेतले. याच सिरीज मधल्या तिसऱ्या सामन्यात त्यांना उत्कृष्ठ गोलंदाज म्हणुन मेन ऑफ द मेच मिळाली.

हया महान गोलंदाजांनी आपल्या पन्नास विकेट फक्त दहा सामन्यात घेतल्या होत्या. त्यांचे हे रेकॉर्ड रविचंद्रन अश्विन याने नऊ सामन्यात पन्नास विकेट घेऊन तोडले. ते एकवीस सामन्यात शंभर विकेट घेणारे दुसरे भारतीय गोलंदाज आहेत. 27 नोव्हेंबर, 1983 मध्ये त्यांनी एक जादुई कामगीरी केली. त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय सामन्यात फक्त बारा रन देऊन सहा विकेट मिळवल्या सहा वर्षा नंतर स्टुअर्ड बिन्नी यांनी बांगलादेश विरुद्ध हा रेकॉर्ड तोडला. असेच भरपूर रेकॉर्ड अनिल कुंबळे यांनी बनवले अणि तोडले.

जेंव्हा 1995 मध्ये त्यांना इंग्लिश काऊंटींग क्रिकेट मध्ये नोर्डंअंथम कडून खेळण्याची संधी मिळाली. त्या सिझन मध्ये ते शंभर विकेट घेणारे एकमेव खेळाडू होते. पुन्हा आले वर्ष 1996 हे वर्ष अनिल कुंबळे यांच्या जीवनातील सर्वात यशस्वी वर्ष. त्या वर्षी त्यांनी वनडे क्रिकेट मध्ये 61 विकेट घेतल्या आणि कसोटी क्रिकेट आणि वनडे मिळून 90 विकेट घेतल्या. त्या वर्षी ते सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज बनले. नंतर वेळ आली 1996 विश्व चषकाची त्यात भारतीय संघाने सेमी फायनल पर्यन्त मजल मारली. त्यात अनिल कुंबळे यांनी खूप मोठे योगदान दिले. 

हया विश्व चषकात अनिल कुंबळे यांनी सर्वात जास्त पंधरा विकेट घेतल्या होत्या. ऑक्टोंबर 1996 मध्ये अनिल कुंबळे यांनी टायटन कपाच्या फायनल सामन्यात जव्हार श्रीनाथ बरोबर नवूव्या विकेट साठी पन्नास रनाची भागीदारी करून भरतीत संघाला जिंकून दिले. 1999 मध्ये अनिल कुंबळे यांनी एक अद्भूत रेकॉर्ड आपल्या नावावर केला. दील्ही मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात त्यांनी सर्व दहा विकेट आपल्या नावावर केल्या. अशी कामगीरी करणारे ते जगातील दुसरे महान गोलंदाज आहेत. हया गोष्टीला लक्षात ठेवण्या साठी एका ट्रॅफिक सर्कल चे नाव अनिल कुंबळे यांच्या नावावरून ठेवण्यात आले. अणि त्यांना एक कार गिफ्ट म्हणुन देण्यात आले.

2004 मध्ये अनिल कुंबळे असे क्रिकेटर बनले ज्यांनी कसोटी क्रिकेट मध्ये 400 विकेट आपल्या नावावर केल्या. या आगोदर हा कारनामा मिथिया मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनी केला होता. 400 विकेट घेणारे घेणारे अनिल कुंबळे हे कपिल देव यांच्या नंतर दुसरे भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी कपिल देव यांच्या पेक्षा 30 आणि शेन वॉर्न यांच्या पेक्षा 7 सामने खेळून 400 विकेट घेण्याचा विक्रम केला.

अनिल कुंबळे हे जगातील शेन वॉर्न यांच्या नंतर दुसरे असे खेळाडू आहेत ज्यांनी 500 कसोटी विकेट अणि 2000 धावा केल्या आहेत. 10 डिसेंबर, 2004 मध्ये त्यांनी बांगलादेश च्या मोहम्मद रफीक ची विकेट घेत कपिल देव यांना मागे टाकत भारताकडून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 2006 च्या भारत वेस्ट इंडिज सिरीज मध्ये त्यांनी 75 धावा देऊन सहा विकेट घेतल्या.

आयपीएल करियर  
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक पुरस्कार मिळवलेले अनिल कुंबळे कुंबळे निवृत्ती नंतर 2008 मध्ये सुरू झालेल्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळण्यास सुरुवात केली. 

2009 मध्ये अनिल कुंबळे यांनी सर्वोत्तम कामगीरी करत कॅप टाऊन मैदानात राजस्थान रॉयल्स विरूद्ध 3.1 षटकात  5 रन देऊन 5 विकेट मिळवल्या होत्या. त्यात त्यांनी एक मेडण ओव्हर टाकली होती. 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती. पण त्यांचा फायनल सामन्यात पराभव झाला.
 
2010 मध्ये अनिल कुंबळे पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळले होते. त्यात त्यांनी खुप चांगली कामगीरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा उपांत्य फेरी पर्यंत घेऊन गेले होते पण तिथे मुंबई इंडियन्स संघाकडू त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

2011 मध्ये त्यांनी आयपीएल इंडियन प्रीमियर लीग मधून निवृत्ती घेतली 

 मित्रांनो तुम्हाला हि महिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रींणीना फेसबुक वर पुढे शेअर करा धन्यवाद.Post a Comment

0 Comments